पालघर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये गृह मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर :-जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये ८५ वर्षावरील 894 ज्येष्ठ नागरिक व 120 दिव्यांग मतदारांचे मतदान
पालघर, दि. 12 नोव्हेंबर, :- मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान होणार आहे. पालघर जिल्ह्यात मतदानाकरिता मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदारांचा गृह मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.





सदर सुविधेअंतर्गत 128 डहाणू (अ.ज )विधानसभा मतदारसंघांमध्ये 85 वर्षावरील 75 ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर 14 दिव्यांग मतदाराने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
129 विक्रमगड (अ.ज) विधानसभा मतदारसंघांमध्ये ८५ वर्षावरील 67 ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर 10 दिव्यांग मतदाराने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 130 पालघर (अ.ज ) विधानसभा मतदारसंघांमध्ये ८५ वर्षावरील 233 ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर 55 दिव्यांग मतदाराने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
131 बोईसर ( अ.ज ) विधानसभा मतदारसंघांमध्ये ८५ वर्षावरील 47 ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर 21 दिव्यांग मतदाराने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
132 नालासोपारा विधानसभा मतदारसंघांमध्ये. ८५ वर्षावरील 117 ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर 10 दिव्यांग मतदाराने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 133 वसई विधानसभा मतदारसंघांमध्ये. ८५ वर्षावरील 355 ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर 10 दिव्यांग मतदाराने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये गृह मतदान एकूण 1014 झाले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com