अखेर मनसेच्या इशाऱ्यानंतर बेडेकर नगर मधील पाण्याच्या सबलाईनचे काम सुरू.

0
Spread the love

प्रतिनिधी-अभिजित माने

दिवा : दिनांक 19 ऑक्टोबर 2022 रोजी मनसे शाखाध्यक्ष श्री शैलेंद्र कदम यानी दिवा शहर अध्यक्ष श्री. तुषार पाटील व शहर सचिव श्री. प्रशांत गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती दिवा याना एका निवेदना द्वारे सांगितले होते की जर बेडेकर नगर येथील रहिवाशांना पाणी मिळाले नाहीतर यावर्षीची दिवाळी आम्ही महानगर पालिकेच्या नावाने साजरी करणार नाही.

बेडेकर नगरमधील पाण्याच्या सबलाईनला नवीन ब्रॅंच जोडण्यासाठी दिवा मनसे तर्फे पाठपुरावा सुरू होता, पण महापालिका प्रशासन आणि पाणी खात्याचे अधिकारी वारंवार थातुरमातुर उत्तरं देऊन टाळाटाळ करत होते. अखेर या विषयावर मनसेने दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन, दिवाळीपूर्वी काम सुरू न झाल्यास बेडेकर नगर मधील रहिवाशी महापालिकेच्या निषेधार्त यंदाची दिवाळी साजरी करणार नाहीत असा पत्रव्यवहार करून इशारा दिला होता.

याची गांभीर्यपूर्वक दखल घेत आज कामाला सुरुवात करण्यात आली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *