कराड शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची रेकॉर्डब्रेकदमदार कामगिरी..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :-24 तासामध्ये ओगलेवाडी ता. कराड येथील घरफोडीचोरीचा मालमत्तेचा गंभीर गुन्हा उघड करुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालपैकी 784 ग्रॅम 660 मिली वजनाचे सोन्याचे दागिने व 1140 ग्रॅम 35 मिली वजनाचे चांदीचे वस्तु तसेच 102210/- रोख रक्कम असा एकुण 57,08,820/- सत्तावन्न लाख आठ हजार आठशे वीस रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार व त्याचा साथीदार यास केली अटक

दिनांक 02/11/2024 रोजीचे 06.00 ते दिनांक 04/11/2024 सकाळी 07.00 पर्यंत साई किला, खरेदीविक्री संघांचे पाठीमागे, ओगलेवाडी ता कराड जि. सातारा या इमारतीचे दुसरे मजल्यावरील मोरीचे खिडकीचा गज कापुन दोरीचे सह्याय्याने घरात प्रवेश करुन आईचे बेडरुमचा दरवाजा तोडुन फियांदी यांचे घरातील बेडरुममधील दोन्ही लाकडी कपाटाचे लॉकर तोडुन कपाटातील व स्टोअर रुममधील लाकडी कपाटातील तसेच देवघरातील असे एकूण 109.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 1,50,000/- रुपये रोख रक्कम अज्ञात दोन इसमांनी मुद्दाम लबाडीने माझे संमत्ती शिवाय माझे घरातील वर्णनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेहली आहे. तसेच तिसरे मजल्यावरील बाल्कनीचा दरवाजा घरातील कपाटे तोडून नुकसान केले आहे. म्हणून दोन अज्ञात इसमा विरुध्द माझी तक्रार आहे. म्हणून वगैरे मजकुराचे खबरी वरुन कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 1485/2024 BNS 331(2), (3), (4),605, 324(2),3(5) प्रमाणे दिनांक 04/11/2024 रोजी दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हयाचा तपास श्री. आर.ए. ताशिलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे हे करत होते.

सदर गुन्हयाचे तपासा मध्ये गुन्हयाचे घटनास्थळी मिळून CCTV फुटेज तसेच गुन्हा करणेची पध्दत पावरुन सदरचा गुन्हा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत आरोपी यांने केल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत होते. त्याप्रमाणे मा. श्री. समीर शेख सो पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर, सो. अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री अमोल ठाकूर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड व आर.ए. ताशिलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे, श्री. अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी घटनास्थळी भेट देवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच ओगलेवाडी दुरक्षेत्रचे अधिकारी व पोलीस ठाणे कडोल उपलब्ध अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे विषेश पचके तयार करुन सदर पथकाना घटनास्थळातील परिस्थीती व CCTV फुटेज या माहीती आधारावर तपास करणे कामी पथकाना सुचना दिलेल्या होत्या.

त्याप्रमाणे ओगलेवाडी दुरक्षेत्र अधिकारी स.पो.नि माळी यांनी घटनास्थळी मिळुन CCTV फुटेज

मधील आरोपी यांची चेहरेपट्टी व गुन्हयाचे वेळीचे हालचाल व कृती व गुन्हयाची पध्दत यांची पडताळणी व गोनपिय माहीतीच्या आधाराव सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी विनायक काकडया काळे रा. तडवळे ता. खटाव जि. सातारा यांने केला असल्याचे त्यांनी निष्पन्न केले. सदर आरोपी यांस तपासकामी पोलीस ठाणेत बोलावून घेवुन त्यांचे कडे गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हयाचे दिवशीचे हालचाली तसेच ठावपत्ता विचारले असता त्यांने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. तदनंतर त्याचे कडे कसोशिने व कौशल्यपूर्ण, अधिक विश्वासात घेवुन त्याचे कडे विश्वासपूर्ण माहीती व CCTV फुटेजचे आधारावर चौकशी केले असता आरोपी याने सदरचा गुन्हा हा त्याचा जावई 2. सिध्दांत शंशीकांत भोसले वय 23 वर्षे रा. वडघुल ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर याचे सोबत केला असल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयात नमुद आरोपी यांना अटक करुन त्याची पोलीस अभिरक्षा मंजुर करुन पोलीस अभिरक्षा कालावधी मध्ये त्याचे कडे अधिक व सखोल तपास करुन गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 784 ग्रॅम 660 मिली वजनाचे सोन्याचे दागिने व 1140 ग्रॅम 35 मिली वजनाचे चांदीचे वस्तु तसेच 102210/-रोख रक्कम असा एकुण 57,08,820/- (सत्तवन्न लाख आठ हजार आठशे वीस रुपये) किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. नमुद अटक आरोपी क्रमांक व 2 यांची दिनांक 12/11/2024 रोजी पर्यंत पोलीस अभिरक्षा मंजुर करण्यात आली असून सदर आरोपी यांचे कडे तपास सुरु आहे. सदरची कामगिरी मा. श्री. समोर शेख सो पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली

कडुकर, सो. अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री अमोल ठाकुर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड व आर.ए. ताशिलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे, श्री. अरुण देवकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखालो म.पो.नि. श्रीसुंदर, स.पो.नि भापकर, स.पो.नि माळी, म.स.पो.नि. जाधव, म.स.पो.नि वाघमोडे, म.स.पो.नि आंबले. स.पो.नि. शादीवान, स.पो.नि. बाबर, पो. उपनि मगदुम, पो. उपनि आंदेलवार, म.पो.उपनि माने, पोहवा 211 वाडकर, पो.हवा 24 सांळुखे, म.पोहचा. 2217 डुबल, मपोहवा. 1419 सांळुखे, पो.ना.2204 स्वामी, पो.ना. 2354 पाडळे, पोहवा 508 काळे (बंदोबस्त कामी वडुज), पो.कॉ. 2531 सांडगे, पोकों. 101 पाटील पो.कों 2423 कोरडे, पो.कॉ.468 मोमीन, पो.कॉ.2612 जाधव, पो.कॉ. 1146 शिदे, म.पो.कॉ 1700 पिसाळ, पो.कॉ 852 सुखदेव, पो.कॉ. 1316 शेडगे, पोकों 2650 पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे कडील स.पो.नि फारणे, पोहवा 1152 वेबले, पोहवा 997 फडतरे, पो. हवा549 सकपाळ, पोहवा 587 चव्हाण, पोकों 774 पवार यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट