अवैद्य अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास गावठी बनावटीचे १ माऊजर पिस्टल व १ जिवंत काडतुसासह ठाणे पोलीसानी केले जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-राज पाटील

भिवंडी :– विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने अंमली पदार्थ / अवैद्य शस्त्र यांची विक्री करणे, जवळ बाळगणारे इसमांच्याविरुद्ध विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याबाबत मा. पोलीस आयुक्त, ठाणे यांचे आदेश झाले आहेत. त्याअनुषंगाने मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. श्री. पंजाबराव उगले, व मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. शिवराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १ गुन्ह श्री. शेखर बागडे यांच्या सुचनेप्रमाणे गुन्हे शाखा घटक २, भिवंडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन सोनवणे यांनी विशेष पथक स्थापन केले होते.

गुन्हे शाखा घटक २, भिवंडी चे पोशि/१९९७ आमेल इंगळे यांना दिनांक ०८/११/२०२४ रोजी माहिती प्राप्त झाली की, ” इसम नामे बुर मोहम्मद अन्सारी, रा. डोंगरपाडा, गायत्रीनगर, भिवंडी, याने त्याचे मुळ गांव उत्तरप्रदेश येथुन अग्निशस्त्र आणली असुन सदर अग्निश्स्त्र हे आपले जवळ बाळगुन तो दिनांक ०८/११/२०२४ रोजी २०.०० वा. रामनगर पाण्याची टाकीजवळ, भिवंडी येथे बसला आहे. प्राप्त माहितीच्या आधारे सापळा कारवाईमध्ये आरोपी नामे मुर मोहम्मद हनिफ अन्सारी, वय २१ वर्षे, धंदा- बेकार, रा.नमा-ऐ-सिमला मजीद, डोंगरपाडा, गायत्रीनगर, भिवंडी, जि. ठाणे यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचे ०१ माऊजर पिस्टल व ०१ जिवंत काडतुसे मिळून आली. नमुद आरोपी यास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याचे अंगझडतीमध्ये मिळून आलेल्या गावठी पिस्टल जिवंत काडतुस मिळून आली.

अशा प्रकारे वर नमुद अटक आरोपी याचेकडे ३०,३००/- रू. किमतीच्या गावठी बनावटीचे ०१ माऊजर पिस्टल व ०१ जिवंत काडतुस मिळुन आली आहे. सदस्बाबत ताब्यात घेण्यात आलेल्या वर नमुद इसमाच्या विरूद्ध शांतीनगर पोलीस स्टेशन, भिवंडी गुन्हा नोंद क्रमांक १७०२/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनीयम चे कलम १४२,३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक २, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन सोनवणे, सपोनि/श्रीराज माळी, पोउपनि / रविंद्र पाटील, सपोउनिरी/सुधाकर चौधरी, पोहवा/प्रकाश पाटील, पोशि / अमोल इंगळे, उमेश ठाकुर, भावेश घरत, सचिन सोनवणे, विजय कुंभार, नितीन बैसाणे, चापोशि / रविंद्र साळुंके यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट