भिवंडीत हातभट्टी दारू वाहतूक वर भिवंडी शहर पोलीसांकडून धडक कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक- राज पाटील

भिवंडी :– विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज दिनांक 09/11/2024 रोजी 23.00 ते 10/11/2024 दरम्यान ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले. त्यादरम्यान पोशि अमोल इंगळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम गावठी हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात फोर व्हीलर गाडीतून वाहतूक करून फेनेपाडा या ठिकाणी येणार आहे.

त्यानुसार आम्ही सपोनि माळी व स्टाफ सह एक पथक तयार करून वराळदेवी तलावाच्या बाजूला, फेणेपाडा या ठिकाणी सापळा लावून एक मारुती सुझुकी कंपनीची SX4 गाडी नंबर MH-43 R- 9263 ही कामतकर कडून फेणेपाड्याकडे येत असताना वराळदेवी तलावाचे बाजूला, फिनेपाड्याकडे जाणाऱ्या रोडवर सदरची गाडी ताब्यात घेतली. सदर पथकाने गाडीची झडती घेतली असता गाडीत 19 प्लॅस्टिकच्या गोणी मध्ये गावठी हातभट्टीची 570 लिटर दारू एकूण किंमत 1,14,000/- मिळून आली.

तसेच इसम नामे कोमल रामसुरत मौर्य वय 49 वर्ष रा. फेणेगाव, राजा पाटील यांच्या जागेत, कामगार, भिवंडी यास ताब्यात घेऊन, मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली गाडी असा एकूण 4,14,000/- मुद्देमाल जप्त केला असून भिवंडी शहर पोलीस ठाणे गु. र. न. 1116/2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई ) (अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भिवंडी शहर पोलीस ठाणे करत आहे.

कारवाई पथक:-
1) सपोनि श्रीराज माळी
2) सपोउपनिरी सुधाकर चौधरी
3) पोहावा / सचिन जाधव
4) पोहावा / राजेंद्र राठोड
5) पोहावा / किशोर थोरात
6) पोशि/ सचिन सोनवणे
7) पोशि/ उमेश ठाकूर
8) पोशि/ भावेश घरत
9) पोशि/ अमोल इंगळे

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट