आगामी विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या अनुषंगाने वसईरोड रेल्वे पोलीस ठाणे अंतर्गत भाईंदर रेल्वे स्टेशन येथे रूट मार्च….!

उपसंपादक : मंगेश उईके
भाईंदर.:-
दिनांक 09/11/2024 रोजी 17:05 ते 17: 45 वाजेपर्यंत भाईंदर रेल्वे स्टेशन येथे अनघा सातवसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसईरोड रेल्वे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च संचलन करण्यात आले .
सदर रूट मार्च दरम्यान भाईंदर रेल्वे स्टेशन येथील फलाट क्रमांक 06,01 ,ब्रीज, बुकिंग व स्टेशन परिसर येथे शिस्तबद्ध रूट मार्च संचलन करून रेल्वे प्रवाशांमध्ये पोलीस सतर्क असले बाबतची भावना निर्माण करून रूट मार्च संचलन यशस्वी केलेले आहे.
सदर रूट मार्च करिता स्वतः, वपोनि. सातवसे,पोउपनि.पाटील,पोउपनि. खैरणार, 08 पोलीस अंमलदार,02 होमगार्ड, व RPF भाईंदर 01 अधिकारी, ,02 कर्मचारी,05 MSF यांनी सहभाग घेतलेला होता .




ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com