स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी शासनाने निर्बंध केलेले अवैध सुगंधी तंबाखु साठा करणारे आरोपी केले जेरबंद ..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-पोलीस स्टेशन

कवठेमहांकाळ

१२,१२,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत. अपराध क्र आणि कलम

गु.र.नं. ४६४/२०२४

बी.एन.एस. कलम २२३, २७४, १२३ सह अन सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम ५९ प्रमाणे

फिर्यादी नाव

पोशि १०५६/ प्रमोद साखरपे, नेम- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.

गु.घ.ता वेळ दि. ०४.११.२०२४ रोजी

गु.दा.ता वेळ

माहिती कशी प्राप्त झाली पोशि / प्रमोद साखरपे

मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली.

दि. ०४.११.२०२४ रोजी २१.०८ वा.

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. यांचे मार्गर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिवे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन, पोहेका / संजय पाटील, सुर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार,
पोशि / प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, सुरज थोरात, गणेश शिंदे, सुशांत चिले सायबर पोलीस ठाणेकडील पोशि/कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विवेक साळुंखे

अटक वेळ दिनांक

. ०४.११.२०२४ रोजी १६.३० वा. दि

आरोपीचे नांव पत्ता

ललित सुमेरमल कच्छिया, वय ५७ वर्षे, रा बोपेगाव, ता वाई, णि सातारा

जप्त मुद्देमाल १) ३.४८,४८०/- रू. विमल पानमसाला केसरयुक्त लाल रंगाचे कव्हर असलेला एकूण ८० बॅगा प्रत्येक बॅगेत
२२ पुढे प्रति पुडा १९८ रू. दराने कि.अ.) ९९,८४०/- रु. विमल पानमसाला केसरयुक्त निळ्या रंगाचे कव्हर असलेला एकूण १६ बॅगा प्रत्येक बॅगेत २ ५२ पुडे प्रत्ति पुडा १२० रू. दराने कि.अ.

३) ३८,७२०/- रु. व्ही-१ टोबॅको जर्दा हिरवा कव्हर असलेल्या एकूण ८ बेंगा प्रत्येक बॅगेत २२ पुढे असलेली एक छोटी बॅग अशा १० बॅगा त्यापैकी प्रत्येक एका बॅगेची किंमत ४,८४०/-रू.

बॅगेतील असलेल्या छोटया बेंगामधील प्रत्येक पुडीची किंमत २२/-रु.

५) २४,९६०/-रु. व्ही-१ टोबॅको जर्दा पिवळ्या रंगाचे कव्हर असलेल्या एकूण ४ बॅगा प्रत्येक बॅगेत ५२ पुढे असलेली एक छोटी बंग अशा ४ बेंगा त्यापैकी प्रत्येक एका बॅगेची किमत ६.२४०/-रू. बॅगेतील असलेल्या छोटया बॅगामधील प्रत्येक पुडीची किंमत ३०/-रू. ६) ७,००,०००/- रु. १ चार चाकी वाहन

१२,१२,०००/- रु..

गुन्हयाची थोडक्यात हकीकत-

सध्या महाराष्ट्रात विधानसमा २०२४ ची निवडणुक आदर्श आचारसंहिता लागू झालेली असुन त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी त्यांचे अधिनस्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक अवैध गुटखा व सुगंधी पत्ती तंबाखु तस्करी, साठा, विक्री, वाहतूक, व वित्तरण करणारे इसमांचेवर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध गुटख्याची विक्री, वाहतुक व साठा करणा-या लॉकाची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत दिले होते.

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांचे पथकातील पोशि/प्रमोद साखरपे यांना त्यांचे बातमीदाराने गोपनीय बातमी दिली की, कोकळे ते रांजणी जाणारे डांबरी रोडने बेकायदेशीरपणे, मानवी जीवनाला अपायकारक, महाराष्ट्र शासनाने निर्बध केलेले सुगंधी गुटखा एका पांढ-या रंगाच्या चारचाकी इनोव्हा गाडी क्र. एम.एच. ०१ ए. एम. ४५३७ ने वाहून नेणार आहे अशी बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे रानमळा कोकळे येथे जागून बाँच केला असता कोकळे गामाकडून रांजणी रोडने एक पांढ-या रंगाची इनोव्हा चारचाकी गाडी येत असताना दिसली तिला थांबण्याचा इशारा करून गाडी थांबवून गाडी चालकास त्याचे नाव गाय विचारले असता त्याने त्याचे नाव ललित सुमेरमल कच्छिया, गय ५६ वर्षे, रा बोपेगाव, ता बाई, जि सातारा असे सांगितले. सदर गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये विमल सुंगधी सुपारी व व्ही १ सुगंधी तंबाखू मिळून आली. त्यास सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल कर्नाटक मधून आणला असून तो त्याचे गावी विक्री करीता घेवून जात असल्याचे सांगितले.

लागलीच सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून तो जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीवर कवठेमहांकाळ, पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट