देवभूमी हाॅल येथे श्री गणरायाच्या व संविधानाच्या प्रतीमेसमोर नारळ ठेऊन राजेश पाटील यांनी प्रचाराचा शुभारंभ केला…!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर :- दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सफाळे पुर्व येथील देवभूमी हॉल मध्ये, बोईसर विधानसभा, बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील सह पक्षाचे कार्याध्यक्ष राजीव पाटील, प्रविण राऊत (दादा) – सामाजिक कार्यकर्ते, सुरेश तरे जेष्ठ कार्यकर्ते तसेच बविआ- पालघर तालुका अध्यक्ष, विभागाचे प्रमुख नेते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अनेक कार्यकर्ते उपस्थित प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते श्री. गणरायाच्या व संविधानाच्या प्रतिमेसमोर श्रीफळ ठेऊन राजेश पाटील यांच्या विधानसभा २०२४ च्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मान्यवर राजीव पाटील ( नाना ) प्रविण राऊत ( दादा) यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत विजयासाठी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले, आपली शिटी निशाणी पळवण्याचा प्रयत्न करणा-यांना न्यायालयाने चांगलीच चपराक दिल्याने व आपले लोकनेते व सहकारी यांच्या अथक प्रयत्नानंतर शिटी निशाणी आपल्याला पुन्हा मिळाली हा आपलाच विजय असल्याचे शुभ संदेश आहे ही सांगितले.

मान्यवर यांनी आलेल्या तरूण तडफदार कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना सांगितले, मागील विधानसभेच्या वेळी राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली तेव्हा बोईसर मतदारसंघासाठी राजेश पाटील यांची उमेदवारी हा नवखा चेहरा होता. आता मात्र निवडून आल्यावर राजेश पाटील हे सतत पाच वर्षे कार्यरत असलेले उमेदवार असून. विशेषतः कोव्हिड सारख्या जागतिक महामारीच्या काळात प्रत्यक्ष जनतेत जाऊन, प्रत्येक व्यक्तीची विचारणा करीत. त्यांना जेवण पोहचविणे, हॉस्पिटलमध्ये बेड तसेच रेमेडिसिव्हिअर सारखी औषधे व ऑक्सिजन उपलब्ध करून देत त्यांची काळजी घेत होते. कोविड काळात मतदार क्षेत्रात पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता. मात्र पुढील तीन वर्षांत वेगवेगळ्या योजनांतून जवळपास १४०० ते १५०० कोटींचा निधी राजेश पाटील आमदार यांनी आपल्या मतदार क्षेत्रात आणला. प्रत्येक गाव पाड्यापर्यंत विकास कामे पोहचवली. जल जीवन मिशन, मत्स्य विभाग, कृषी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास निधी, ठक्कर बाप्पा अशा विविध योजना राबवून, त्यांचा लाभ हा तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवला. राजेश पाटील यांच्या या मेहनतीला कौल देत बविआ चे पक्ष श्रेष्ठींनी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. तेव्हा पुन्हा राजेश पाटील या कर्तव्य तत्पर आमदारांना भरघोस मतांनी निवडून देऊन, आपल्या मतदारसंघातील विकासासाठी व पालघर जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे स्थान बळकट करायचे आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट