लक्ष्मीपूजन दिवशी गुटखा खाऊन फळांवर थुंकणारया विक्रेताला स्थानिकांनी दिले पोलीसांच्या ताब्यात…

प्रतिनिधी :- विलास चव्हाण
मालवण :- मालवण शहरातील बस स्थानकावर फळे विक्रीचा
व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्याला स्थानिक नागरिकांनी हटकून चांगलाच प्रसाद दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशा लोकांना कायमस्वरूपी मालवण मधून हाकलून देण्याची मागणी शहरवासियांमधून करण्यात येत आहे.

बसस्थानक परिसरातील एक व्यापारी आज संध्याकाळी येथे लक्ष्मी पूजनासाठी फळे खरेदी करण्यासाठी गेला असता हा फळ विक्रेता तोंडात गुटखा खाऊन फळावरून पिचकाऱ्या मारत असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहताच नागरिक संतप्त झाले. त्यांनी या विक्रेत्याला जाब विचारून चांगलाच प्रसाद दिला. हा फळ विक्रेता यापूर्वी रांगोळी महाराज मठाकडे फळाची गाडी लावत होता. आता तिकडे त्याने आपल्या भावाला आणून बसवले असून तो स्वतः बस स्थानक नजीक फळ विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्याला प्रसाद देऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याला मालवण मधून हाकलून लावण्याची मागणी होत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com