स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी अभिलेखावरील तडीपार गुंडाकडुन 2 देशी बनावटीची पिस्टल, 2 मॅक्झीन, 2 जिवंत काडतुसे,1 मोटार सायकल असा 2,20,640/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :- श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कड्डुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अगामी विधानसभा निवडणुक-2024 चे अनुशंगाने सातारा जिल्हयामध्ये विषेश मोहिम राबवून अवैध शस्र, अवैध
धंद्यावर कारवाई करणेच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या होत्या.

दि.27/10/2024 रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली आहे की, कराड शहरातील भेदा चौक परिसरामध्ये कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील तडीपार इसम निशिकांत शिंदे हा बेकायदेशीररित्या अवैध शस्र विक्री करणे करीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सहा. पोलीस निरीक्षक रोहित फाणे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना मिळाले बातमीचा आशय सांगून सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक रोहित फाणे यांचे पथकाने कराड शहरामध्ये जावुन भेदा चौकात सापळा लावला असता सदर ठिकाणी मिळाले बातमीतील इसम हा त्याचेकडील मोटार सायकल वरुन येत असताना दिसला. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास शिताफीने पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात 1,40,000/- रुपये किंमतीची दोन देशी बनावटीची पिस्टल, दोन मोकळया मॅग्झीन, दोन जिवंत काडतुसे व एक मोटार सायकल मिळुन आल्याने त्याचे विरुध्द कराड शहर पोलीस ठाणे येथे गुरनं. 1436/2024 भारतीय शख अधिनियम कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे.

माहे नोव्हेंबर 2022 पासून 97 देशी बनावटीची पिस्टल, 4 बारा बोअर, 223 जिवंत काडतुसे व 377 रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, राजु ताशिलदार कराड शहर, सहा. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणें, अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिगाडे, पारितोष दातीर, निखील मगदुम, पोलीस अंमलदार अतिष घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिके, विजय कांबळे, शरद बेबले, लेलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित माने, अविनाश चव्हाण, अमित सपकाळ, स्वप्निल कुंभार, गणेश कापरे, मोहन पवार, ओकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रवीराज वर्णकर, शिवाजी गुरव सायबर शाखेचे रामदास भास्करवाड तसेच कराड शहर पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार धिरज कोरडे, दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, आनंदा जाधव यांनी सदरची कारवाई केली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट