निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कडेगांव पोलीस ठाणे हद्दीतील प्रदीप मंडले टोळी दोन वर्षासाठी हद्दपार..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-कडेगांव पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार प्रदीप मंडले टोळीस मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी २ वर्षे कालावधीकरिता हद्दपार आदेश पारीत केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.



कडेगांव पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख अ. नं. १) प्रदीप पंढरीनाथ मंडले, वय २७ वर्षे, रा. मंडले वस्ती, हणमंतवडीये, ता. कडेगांव व टोळी सदस्य २) मयुर मुरलीधर मंडले, वय २३ वर्षे, रा. मंडले वस्ती, हणमंतवडीये, ता. कडेगांव ३) राहुल तुकाराम मदने, वय २३ वर्षे, रा. खेराडे विटा, ता. कडेगांव, जि. सांगली या टोळीविरुद्ध सन २०२३ मध्ये विहीर, तलाव, कैॉल इत्यादीवरील शेतक-यांच्या पाण्याच्या मोटारी चोरी करणे असे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. नमुद टोळीतील सामनेवाले हे कायदा न जुमाणनारे आहेत. त्यामुळे या टोळ्यांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी कडेगांव पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर प्रस्तावांचे अवलोकन करुन, चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा विभाग, विटा यांचेकडे चौकशी कामी पाठविला, त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार कडेगांय पोलीस ठाणेकडील टोळी प्रमुख अ. नं. १) प्रदीप पंढरीनाथ मंडले, वय २७ वर्षे, रा. मंडले वस्ती, हणमंतवडीये, ता. कडेगांव व टोळी सदस्य २) मयुर मुरलीधर मंडले, वय २३ वर्षे, रा. मंडले वस्ती, हणमंतवडीये, ता. कडेगांव ३) राहुल तुकाराम मदने, वय २३ वर्षे, रा. खेराडे विटा, ता. कडेगांव, जि. सांगली यांना सांगली व सातारा या दोन जिल्हयातून २ वर्षे कालावधी करिता तडीपार केलेबाबत आदेश दि. २५/१०/२०२४ रोजी पारीत केला आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभा २०२४ ची निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून गुन्हे करणारे गुन्हेगारी टोळींचा बिमोड करण्यासाठी भविष्यात अशा प्रकारची कारवाई केली जाणार आहे.
सदर कारवाईमध्ये मा. संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, मा. रितू खोखर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक स्था.गु.अ. शाखा सांगली, संग्राम शेवाळे, पोलीस निरीक्षक कडेगांव पोलीस ठाणे, पोहेकों/ अमोल ऐदाळे, पोकों/दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा सांगली तसेच पोना/ पुंडलिक कुंभार कडेगांव पोलीस ठाणे, यांनी भाग घेतला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com