स्थानिक गुन्हे शाखा, सांगली यांची विना परवाना देशी व विदेशी दारु विक्रीसाठी वाहतुक करणा-या इसमावर कारकई एकुण २.२६.५४३/- रु. चा दारुचा व इतर मुद्देमाल हस्तगत..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-पोलीस स्टेशन

विटा

अपराध क्र आणि कलम

फिर्यादी नाव

गु.र.नं. ४६३/२०२४, महाराष्ट्र दारुबंदी पोकों अधिनियम ६५ (क)

/ सुरज थोरात, स्था.गु.अ. शाखा, सांगली

गु.घ.ता वेळ

गु.दा.ता वेळ दिनांक २८.१०.२०२४

माहिती कशी प्राप्त झाली गोपनीय बातमीदारामार्फत

दिनांक २८.१०.२०२४ रोजी १८.०० वा. मिटा नेपरी रोडबर

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. यांचे मार्गर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा, पोहेकों / संजय पाटील, सुर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, पोकों प्रमोद साखरपे, गणेश शिंदे व विटापोलीस ठाणेकडील किरण खाडे, उत्तम माळी अटक वेळ दिनांक दि. २८.१०.२०२४ रोजी

आरोपीचे नांव पत्ता

महेश ऊर्फ पिंटु वसंतराव उबाळे, वय ४२ वर्षे पत्ता वासुंबे रोड, विटा

जप्त मुद्देमाल

१. ७६.५४३/- रु देशी व विदेशी दारुचा साठा

२. १,५०,०००/- रु. एक पांढरे रंगाची दारू वाहतुक करणारी ओमनी गाडी

२,२६,५४३/- (दोन लाख, सवीस हजार, पाचशे त्र्येचाळीस रुपये मात्र)

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

सध्या महाराष्ट्रात विधानसभा २०२४ ची निवडणुक आदर्श आचारसंहिता लागू झालेली असुन ऐन निवडणुकीच्या काळात समाज विरोधी घटकांकडुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध व बिगरपरवाना दारु विक्री, वाहतुक व कब्जात बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सदर सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील उपविभागान्यये पथक तयार करण्यात आले आहे.

त्या अनुशंगाने दि. २६.१०.२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोहेकॉ हणमंत लोहार यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इसम नामे पिंटु उबाळे हा बेकायदा बिगरपरवाना विदेशी दारुचा साठा त्याचे ओमनी गाडीतुन विक्री साठी विटा ते नेवरी जाणारे रोडने घेवुन जाणार आहे.


नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, विटा ते नेवरी जाणारे रोडवर संशयित वाहनावर बाँच करीत थांबले असता एक संशयित पांढरे रंगाचे ओमनी वाहन येत असताना दिसल्याने त्यास थांबवुन बाहन चालकास त्याचे नाव विचारता त्यांने त्याचे नाव महेश ऊर्फ पिंटु वसंतराव उबाळे, वय ४२ वर्षे, पत्ता वासुबे रोड, विटा असे सांगितले.

त्यास झडतीचा उद्देश कळवुन ओमनी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारु, विदेशी दारु व बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स किं. रुपये ७६,५४३/- व चार चाकी ओमनी गाडी असा एकुण २,२६,५४३ रुपये किमंतीचा माल मिळुन आल्याने सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांनी सदरचा माल पंचनाम्याने जप्त केला असुन आरोपी विरुन्द पोकों / सुरज थोरात यांनी विटा, पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास व कार्यवाही कामी विटा, पोलीस ठाणेकडे वर्ग केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट