भोर विधानसभेसाठी महाविकास आघाडीची रणनीती..!

प्रतिनिधी-मारूती गोरे
पुणे ग्रामीण : -दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
मुळशी : महाविकास आघाडी प्रणित काँग्रेस पक्षाकडून भोर विधानसभा मतदारसंघाकरिता आमदार संग्राम थोपटे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यांचा २४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पुढील नियोजन संदर्भात पुणे येथे महाविकास आघाडीच्या भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

याप्रसंगी प्रचाराच्या पुढील नियोजनाबद्दल व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सचिन अहिर यांनी मार्गदर्शन करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून यासाठी मातोश्रीवरून आलेल्या आदेशाचे पालन करत सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे सांगितले.
या बैठकीला उमेदवार संग्राम थोपटे, सोपान मोहोळ, संग्राम मोहोळ, बाळासाहेब थोपटे, मानसिंग धुमाळ, महेश टापरे, सविता दगडे, महादेव कोढरे, संतोष रेणुसे, रवींद्र बांदल, माऊली शिंदे, अविनाश बलकवडे, सचिन खैरे, गंगाराम मातेरे, संतोष मोहोळ, कोमल वाशिवले, स्वाती ढमाले, नानासो राऊत, शैलेश सोनवणे, विठ्ठल आवाळे, दिनकर धरपाळे, अमोल नलावडे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com