मिरज ग्रामीण पोलीसांकडून गुन्हेगारी टोळीवर मोका अंतर्गत कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
मिरज :-
श्री, सुनिल फुलारी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी मिरज ग्रामीण, पोलीस ठाणे हद्दीतील तरबेज ऊर्फ तब-या चारशिट्या शिंदे वगैरे ०७ जाणांचे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) कायद्यान्वये दिली परवानगी
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, गु.र.नं. २९०/२०२४, मा.दं.सं. कलम ३९५. ३९७ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी चंद्रकांत विठ्ठलराव भावीकाडी, वय ४२ वर्षे, राज्य तेलंगाना हे त्यांचे कुटुंबासोबत दि. २४/०५/२०२३ रोजी रात्री १२.०० वा.चे सुमारास पंढरपुर ते रत्नागिरी जाणारे महामार्गाचे शेजारी कळंबी येथील पेट्रोल पंपावर कुजर वाहन थांबवुन वाहनामध्ये झोपलेले असताना रात्री ०१.०० वा. चे सुमारास अज्ञात ०७ ते ०८ इसमांनी त्यांना चाकूचा धाक दाखवुन चाकुने फिर्यादी व त्यांचे पत्नीस जखमी करुन १,६९,०००/- सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम दरोडा टाकुन जबरदस्तीने चोरुन नेली होती.
वरील गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी १) तरबेज ऊर्फ तब-या चारशिट्या शिंदे २) रणजित अशोक भोसले, वय २५ वर्षे, पत्ता गोळीबार मैदान, वड्डी ता. मिरज ३) सुरेश रवि भोसले, वय २० वर्षे, पत्ता आंबेडकर नगर, टाकळी बोलवाड, ता. मिरज जि. सांगली ४) पल्ली भोसले, पत्ता पाटगांव, ता. मिरज ५) अक्षय शहाजी काळे, पत्ता मालगांव, ता. मिरज ६) कुशल आनंदराज काळे, पत्ता एरंडोली, ता. मिरज ७) सिराज ऊर्फ किरण शिसफुल भोसले, पत्ता आंबेडकर नगर, टाकळी बोलवाड, ता. मिरज जि. सांगली यांना निष्पन्न केले होते,



या गुन्हयाचा तपास करताना रेकॉर्डवरील गुन्हेगार टोळीप्रमुख १) तरबेज ऊर्फ तब-या चारशिट्या शिंदे व टोळीतील सदस्य २) रणजित अशोक भोसले, वय २५ वर्षे, पत्ता गोळीबार मैदान, वड्डी ता. मिरज ३) सुरेश रवि भोसले, वय २० वर्षे, पत्ता आंबेडकर नगर, टाकळी बोलवाड, ता. मिरज जि. सांगली ४) पल्ली भोसले, पत्ता पाटगांव, ता. मिरज ५) अक्षय शहाजी काळे, पत्ता मालगांव, ता. मिरज ६) कुशल आनंदराज काळे, पत्ता एरंडोली, ता. मिरज ७) सिराज ऊर्फ किरण शिसफुल भोसले, पत्ता आंबेडकर नगर, टाकळी बोलवाड, ता. मिरज जि. सांगली यांनी मागील १० वर्षात बेकायदेशीर कृत्ये सतत चालु ठेवल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायद्यासह इतर गैरवाजवी लाभ स्वतः किंवा दुस-यास मिळविण्यासाठी टोळीचे वतीने एकट्याने किंवा एकत्रितपणे दरोडा, मृत्यु किंवा जबर दुखापत घडवून आणण्याचा प्रयत्नासहित दरोडा, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करुन, गृह-अतिक्रमण, अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्विकारणे अशा गंभीर स्वरुपाचे एकुण १७ गुन्हे नोंद असल्याचे व गुन्हयांची शृखंला सतत चालु ठेवल्याचे निष्पन्न झाले होते.
त्या अनुषंगाने मिरज ग्रामीण, पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मांका) कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांचे कडे सादर केला होता. मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी टोळी प्रमुख व टोळी सदस्यांचे विरुध्द दाखल गुन्हयांचा अभिलेख पडताळून तसेच गुन्हयांचा, त्यांचे सद्यस्थितीचा अहवाल व त्यांचेवर केलेली प्रतिबंधक कारवाई या सर्व प्रस्तावातील बाबी विचारात घेऊन सदरचा प्रस्ताव मंजुरीकरीता श्री. सुनिल फुलारी, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांचेकडे सादर केला होता.
श्री. सुनिल फुलारी, मा. वि.पो.म.नि. कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण, पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक, सांगली यांचे शिफारशीचे व सोबतच्या कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास करुन, गुन्हयांचा अभिलेख पाहुन सदर प्रस्तावास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ च्या कलम २३ (१) (अ) प्रमाणे दिनांक २५.१०.२०२४ रोजी मंजुरी दिली असुन मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, गु.र.नं. २९०/२०२४. भा.दं.सं. कलम ३९५. ३९७ या गुन्हयात मोका कायदा कलम अंतर्गत ३(१) (1), ३(२), ३ (४). ४ या कलमांचा अंतर्भाव करणेसाठी पुर्व परवानगी दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग, मिरज हे करीत आहेत.
विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, परित्रेक्ष यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) कायदयाअंतर्गत या गुन्हयास कलम वाढ करणेसाठी मंजुरी दिली असुन सदर कारवाई मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली, मा. रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक स्था.गु.अ. शाखा सांगली, पो.नि. भैरु तळेकर व सहा. पोलीस निरीक्षक, रणजित तिप्पे, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, पोहेको / अमोल ऐदाळे, पोकों/दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा सांगली तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील पोहवा / शशिकांत जाधव, पोहवा ओमासे, पोना । सचिन मोरे, विकास भोसले व पोकों/ सुनिल देशमुख यांनी भाग घेतला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

