मंदिरातील वस्तूंची चोरीचे गुन्हयाची उकल करण्यात पालघर पोलीसांना यश..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :-पालघर पोलीस ठाणे गु.र.नं. २१२/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१ (४) प्रमाणे दि.१७/१०/२०२४ रोजी दाखल अहे. सदर गुन्हयात अज्ञात आरोपी यानी दि. १६/१०/२०२४ रोजी रात्री ०८.०० ते दि. १७/१०/२०२४ रोजी ०६.०० वा. चे दरम्यान मौजे वेचुर ता.जि. पालघर येथील पंचमुखी शिवमंदिराचे स्लायडींगची खिडकी तोडुन, त्यावाटे मंदिरात प्रवेश करुन, मंदिरातील पितळीचे समई, त्रिशुल, गंगाळ, दोन तांबे व घंटा असा एकुण ३०,०००/- रु. किमंतीचा ऐवज घरफोडी चोरी करुन चोरुन नेलेला आहे.

बाळसाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर, अभिजीत धाराशिवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे नोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व पोनि/प-हाड, पालघर पोलीस ठाणे यांनी सदर मंदिर चोरीचे गुन्हयाचा समांतर तपास करणे कामी १) पोउनि/रविंद्र वानखेडे, २) पोहवा/२२६ राकेश पाटील स्थागुशा पालघर तसेच ३) पोउनि/अविनाश वळवी, पोहवा /भगवान आव्हाड, पोहवा /चंद्रकांत सुरुम, पोअमं/सागर राऊत नेम. पालघर पो. ठाणे यांचे पोलीस पथके तयार केले. नमुद पथकाने घटनास्थळ परिसरात रात्रंदिवस पेट्रोलींग करुन, गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवून सदरचा गुन्हा हा आरोपी १) रंगीलाल बनारसी चव्हाण, वय ६५ वर्षे, रा. गोठणपुर पालघर, २) रोहीत सुनिल मुरा, वय २० वर्षे, रा. मानपाडा शेलवली, ता. जि. पालघर यांनी केल्याचे निष्पन्न करुन, नमुद आरोपींना सदर गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेले पितळीचे समई, त्रिशुल, गंगाळे, दोन तांबे व घंटा असा एकुण ३०,०००/- रु. चा ऐवज जप्त केलेला आहे. गुन्हगाचा पुढील तपास पोउनि/अविनाश वळवी, नेमणुक पालघर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com