लातूर येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून जाणाऱ्या टोळीला बार्शी तालुका पोलीसानी केले अर्ध्या तासात जेरबंद..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बार्शी :-आज दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी आम्ही सहा.पो.नि. दिलीप ढेरे व पोलीस अधिकारी, अंमलदार असे बार्शी तालुका पोलीस ठाणेस हजर असताना सहा. पो.नि. सदानंद भुजबळ नेमणूक पोलीस ठाणे गांधी चौक, लातूर यांनी फोनद्वारे माहीती दिली की, पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीतील अल्पवयीन मुलगा वय 17 वर्षे रा. लातूर यास चार इसमांनी अपहरण करून एका पांढ-या रंगाच्या कारमधून बार्शी मार्गे जात आहेत. तरी त्यांचा शोध घ्या अशी माहीती दिली.

त्याप्रमाणे आम्ही लागलीच वरिष्ठांना माहीती देवून पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पथक नेमून आम्ही बार्शी बायपास रोड, गाताचीवाडी चौक येथे नाकाबंदी करून वाहने चेक करीत होतो. मिळालेल्या प्राथमिक माहीती प्रमाणे वाहने चेक करीत असताना लातूर कडून एक पांढऱ्या रंगाची कार नं. MH 10 BM 4556 ही संशयीतरित्या भरधाववेगाने येत असल्याचे दिसल्याने आम्ही सदर कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आणखीन भरधाव वेगात पळून जाण्याचा इरादा केल्याने पूर्ण रोडवर वाहने आडवेलावून सदर कारला थांविण्यात आले. सदर कारची तपासणी केली असता मिळालेल्या माहीती प्रमाणे आतमध्ये एक भितीने घाबरलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलगा व इतर 4 इसम आढळून आले.

सदर मुलाकडे आस्थेवाईकपणे विचारपूस केली असता सदर मुलाने सोबतच्या 4 इसमांनी लातून येथून कारमध्ये घालून पळवून आणल्याचे सांगितले. सोबतच्या इसमांकडे सदर बाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे 1) मुन्ना कांबळे 2) तुकाराम साळुंखे, 3) मंगेश वंजारी 4) शंकर कोवाळकर सर्व रा. लातूर असे सांगून त्यांनी सदर मुलाबाबत काहीएक समाधानकारक उत्तरे दिले नाही. यावरून सदर अल्पवयीन मुलाचे अपहरण करून पळवून घेत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणून सदरची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना व सहा. पो.नि. सदानंद भुजबळ नेम. पोलीस ठाणे गांधी चौक, लातूर यांना कळविण्यात आली. गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस पथक आल्या नंतर सदर अल्पवयीन मुलगा व आरोपी, गुन्ह्यातील वाहन पूढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे. सदर बाबत गांधी चौक पोलीस ठाणेस गुन्हा रजि.नं. 691/24 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यापैकी एका आरोपीवर यापुर्वी खुनाचा गुन्हा दाखल असून सदरची टोळी ही अतिशय धोकादायक असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री अतूल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रितम यावलकर, मा. उपविभागीय अधिकारी श्री जालिंदर नालकूल यांचे मार्गदर्शनाखाली बाशी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा. पो.नि. दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोहेकों राजेंद्र मंगरुळे, पोहेकों धनराज केकाण, पोहेकॉ सुभाष सुरवसे, पोकों राहुल बोंदर, पोकों शिवशंकर खराडे, पोकों ओमप्रकाश दासरे यांनी केली आहे. तरी सदरची बातमी आपले लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द होणेस विनंती आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट