अनाधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी रिक्षांविरोधात गोरेगाव नांदवी रिक्षा संघटनेच्या परमिट धारक चालकांचे व्हिडीओ व्हायरल…

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव रायगड :-माणगांव :-प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलिसांकडून प्रवासी वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे परमिट धारक रिक्षा चालकांनी केली आर. टी. ओ व पोलिसांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त काही रिक्षा स्क्रॅप मुदतीला पोहचले आहेत तर अनेकांचा विमा संपला आहे तरी देखील बिनधास्तपने होत आहे प्रवासी वाहतूक, चालकांकडून वायरल विडिओ द्वारे संतप्त नाराजी शासनाने वयोवृद्ध नागरिकांना व महिलांना एस टी बस प्रवासामध्ये अर्धा तिकीत स्वीकारून प्रवास करण्याची सवलत दिली असल्यामुळे रिक्षा व छोट्या प्रवासी वाहनांवर याचा निश्चितच प्रभाव पडला आहे. तरी देखील रिक्षा चालक उन्हाळा असो किंवा पावसाळा रिक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमांचे पालन करत प्रवासांच्या प्रतीक्षेत दिवस भर रांगेत राहून तसेच आड मार्गे राहणाऱ्या, अर्ध्या रात्री तात्काळ प्रवास करण्याची गरज असणाऱ्या व आजारी लोकांना दिवसा असो किंवा रात्र प्रवासाची सेवा देऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत.

मात्र माणगांव तालुक्यातील गोरेगांव नांदवी रिक्षा चालक मालक संघटने अंतर्गत चालणाऱ्या प्रवासी वाहन रिक्षा ची अजब कहानी सद्या वायरल होत आहे , गोरेगांव नांदवी रिक्षा लाईन मध्ये १०० पेक्षा अधिक प्रवासी रिक्षा असून यामध्ये अनेक रिक्षा विना परमिट खाजगी रिक्षा आहेत तर अनेक रिक्षांना १५ वर्ष उलटून गेले आहेत व अनेकांचा विमा संपला आहे तरी देखील सदरील रिक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस प्रशासनाला न जुमानता बिनधास्तपने प्रवासी वाहतूक करत असल्याचे गोरेगांव नांदवी रिक्षा संघटनेतील परमिट धारक रिक्षा चालकांकडून संतप्त व्यक्त करण्यात आले आहे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय व गोरेगांव पोलिसांकडून अनाधिकृत पणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या विना परमिट रिक्षांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी संतप्त रिक्षा चालकांकडून प्रादेशिक परिवहन कार्यालय व गोरेगांव पोलिसांना विनंती देखील करण्यात आली आहे.शासनाच्या नियम व अटी नुसार प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चे प्रवासी वाहतुकीसाठी आवशक असणारे कागद पत्र अपूर्ण असतील किंवा विना विमा वाहन प्रवासी वाहतूक करत असेल तर दुर्दैवाने रिक्षा चा अपघात घडला तर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोण जबाबदार राहणार ? असे अनेक प्रश्न देखील नागरिकांकडून निर्माण करण्यात येत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट