सीसीटीएनएस प्रणालीच्या कामकाजामध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये सांगली जिल्हा पोलीस दलाचा संपुर्ण महाराष्ट्र राज्यात ९८.०१ % गुण प्राप्त करुन राज्यात प्रथम…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-मा. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणेयांचे कडुन राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये सीसीटीएनएस (क्रईम अॅण्ड क्रिमीनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) (गुन्हा आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणाली) संगणक प्रणाली कार्यरत आहे. राज्य गुन्हे अन्वेषन विभागाद्वारे प्रत्येक महिन्यात सीसीटीएनएस प्रणालीच्या कामगिरीचा राज्यस्तरीय घटक निहाय आढावा घेण्यात येतो. माहे ऑगस्ट २०२४ मध्ये सीसीटीएनएस प्रणालीच्या राज्यातील ५२ घटकांच्या मासिक कामगिरीचे मुल्यांकन केले असता, यात सांगली जिल्हा सन २०२४ मध्ये सातत्य राखत पहिल्या ३ क्रमांकामध्ये आहे.

दैनंदिन प्रभावी वापरामध्ये व अचुकता राखण्यात, अद्यावत माहिती भरण्यात, नागरीकांच्या ई-तक्रारी इत्यादीबाबत जलदगतीने निर्गती केल्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस दलाने राज्यात १८.१ टक्के गुण मिळवुन ऑगस्ट महिन्यामध्ये प्रथम क्रमांक पटकविलेला आहे.

नागरीकांना कोणत्याही प्रकारे असुविधा होणार नाही तसेच जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याचे सर्व कामकाज हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करुन सर्व कामकाज हे ऑनलाईन पध्दतीने करण्यावर विशेष भर देण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक, रितु खोखर यांनी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. याच अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात सर्वाधिक गुण प्राप्त करुन प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. यापूर्वी देखील सांगली जिल्हयाने तंत्रज्ञान आधारीत पोलिसींग करत कामात सातत्य ठेवून मार्च २०२४ मध्ये
प्रथम क्रमांक, में २०२४ प्रथम क्रमांक, जुन-२०२४ द्वितीय, जुलै-२०२४ तृतीय, व अशीच कामगिरी आणि यश ऑगस्ट-२०२४ मध्ये दाखवुन पुन्हा प्रथम क्रमांक प्राप्त केला असून कामगिरीत सातत्य राखले आहे.

याबाबत पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर (नोडल ऑफीसर सीसीटीएनएस प्रणाली, सांगली) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे. स्था.गु.अ.शाखा, पो.उप.नि. अफरोज पठाण, पो.हे.कॉ./३५१ नितीन महादेव बराले, मपोना/२०६० सलमा उस्मान इनामदार विशेष दखल घेवुन सीसीटीएनएस प्रणालीच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवून वेळोवेळी जिल्हयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच सीसीटीएनएस प्रणालीचे कामकाजात येणाऱ्या अडीअडचणींवर अतिशय चांगल्या प्रकारे उपाययोजना करुन संबंधीत सीसीटीएनएस प्रणालीचे कामकाज करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

यामुळेच सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये सांगली जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगीरी करुन माहे ऑगस्ट २०२४ मध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. याकरीता व जिल्हातील सीसीटीएनएस प्रणाली संबंधाने कर्तव्य करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर (नोडल ऑफीसर सीसीटीएनएस प्रणाली, सांगली) यांनी अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट