वारजे पोलीस स्टेशन कडील खुनाच्या प्रयत्नातील तडीपार आरोपी गुन्हे शाखा युनिट 3 कडून अटक…

उपसंपादक- उमेद सुतार
पुणे :-मंगळवार दिनांक 22/10/2024 रोजी युनिट तीन मधील अधिकारी व अंमलदार हे वारजे पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर 424/2024 बी एन एस कलम 109 व इतर या गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी नामे गणेश तुळशीराम पवार वय 21वर्षे हा रेल्वे स्टेशन येथून त्याच्या राहत्या गावी हैदराबाद येथे पळून जात आहे , अशी खात्रीशीर बातमी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाली मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी नामे गणेश तुळशीराम पवार वय 21 वर्षे, रा. नांदेड गाव फ्लॅट नंबर 102, शिवराम सोसायटी, पुणे, यास वर नमूद ठिकाणी ताब्यात घेऊन त्यास गुन्हे शाखा युनिट 3 चे कार्यालयात आणून चौकशी केली असता त्याने वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली.

म्हणून सदर आरोपी याला वैद्यकीय तपासणी करून रिपोर्टसह वारजे पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पोलीस आयुक्त मा.श्री. अमितेश कुमार सो,पोलीस सह आयुक्त मा. श्री. रंजन कुमार शर्मा सो, मा. श्री. शैलेश बलकवडे सो, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा.श्री. निखिल पिंगळे सो, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा.श्री. गणेश इंगळे सो, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, वपोनि श्री रंगराव पवार, गुन्हे शाखा,युनिट – 3 यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्र्वर ढवळे,पोलीस अंमलदार पोहवा विनोद भंडलकर, गणेश सुतार, संजीव कळंबे , विनोद जाधव, ज्ञानेश्वर चित्ते , हरीश गायकवाड, बंटी मोरे, गणेश शिंदे, यांनी केली आहे.
अशी माहिती रंगराव पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक,. युनिट -3 गुन्हे शाखा, पुणे शहर यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com