शासनाने निर्बंध केलेले सुगंधी तंबाखु व गुटख्याची अवैध वाहतुक करणारे आरोपी जेरबंद , ५०,४९,२००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-पोलीस स्टेशन
कवठेमहांकाळ पोलीस ठाणे
अपराध क्र आणि कलम
गु.र.नं. ४४३/२०२४ बी.एन.एस. कलम २२३, २७४, १२३, ३(५) प्रमाणे
गु.घ.ता वेळ
दि. २०.१०.२०२४ रोजी रात्री ०९.३० वा.
दि. २१.१०.२०२४ रोजी सकाळी ०७.१२ वा.
फिर्यादी नाव
गुंडोपंत बाबासो दोरकर, पोहेकों/ १३५८, नेम स्थानिक गुन्हे अन्वेषण
शाखा, सांगली.
माहिती कशी प्राप्त झाली
पोहेकों/गुंडोपंत दोरकर पोहेकों/अमर नरळे पोना /सोमनाथ गुंडे
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली.
मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली.
यांचे मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, पोहेकों / गुंडोपंत दोरकर, अमर नरळे, दऱ्याप्पा चंडगर,
पोहेकों / आमसिद्धा खोत, सागर लवटे, संदीप गुरव, अनिल कोळेकर पोना/सोमनाथ गुंडे, संदीप नलावडे, पोशि/ विक्रम खोत
अटक वेळ दिनांक
दि. २१/१०/२०२४ रोजी
आरोपीचे नांव पत्ता
१. रायाप्पा कप्पान्ना पुजारी, वय ३५ वर्षे, राउमराणी, ता चिक्कोडी, राज्य कर्नाटक
२. सुनिल ज्ञानोबा शिंदे, वय ४२ वर्षे, रा नांदणी, ता शिरोळ, जि कोल्हापूर जप्त मुद्देमाल
१) ४,३५,६००/- रू. किमतीचे हिरव्या रंगाचे त्यावर व्ही१, टोबॅको किंग पॅक व हॅपी दिवाली असे इंग्रजीत अक्षरात छापील असलेल्या पुडयाची किमंत २२ रु. असे छापील कंपनी दराचे एकुण १९,८०० पुढे
२) २६,१३,६००/-रू. किमतीचे लाल रंगाचे त्यावर केशर युक्त विमल पान मसाला असे मराठीत, इंग्रजीत किंग पॅक वर्ल्ड नं. १ असा मजकूर छापील असलेल्या पुड्याची किमंत १९८ रु. असे छापील कंपनी दराचे एकुण १३,२०० पुडे
३) १५,००,०००/-रु. किमतीचे आयशर कंपनीची तपकिरी रंगाचा एल ११०० माल वाहतुक गाडी जु.वा.कि.अ. ४) ५,००,०००/-रू. किंमतीचे टोयाटो कंपनीची एक लाल रंगाची इटीओस कार गाडी जु.वा.कि.अ.
५०,४९,२००/- (पन्नास लाख एकोणपन्नास हजार दोनशे रुपये)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी दि. १८.१०.२०२४ रोजी विधानसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षक यांची आढावा बैठक घेवून “कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्हयामध्ये अवैध व्यवसायांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्याचे समुळ उच्चाटन करावे” अशा सुचना दिल्या होत्या.



सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध गुटखा विक्री व वाहतुक करणाऱ्या लॉकाची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकातील पोहेकों / गुंडोपंत दोरकर, अमर नरळे, सोमनाथ गुंडे यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सांगली ते सांगोला जाणारे रोडवरून आयशर माल वाहतुक गाडी नं के.ए. २२ डी. ७४२५ मधून बेकायदेशीरपणे, मानवी जीवनाला अपायकारक, महाराष्ट्र शासनाने निर्बंध केलेले सुगंधी तंबाखु व गुटखा चोरुन विक्री करण्याकरीता वाहनातुन मिरजकडून सांगोलाकडे घेवून जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, नागज गावातील हायवेवर सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे आयशर माल वाहतुक गाडी नं. के.ए. २२ डी. ७४२५ ही जात असताना दिसली. तिला हाक्के पेट्रोल पंपाजवळ थांबवून सदर ट्रक चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रायाप्पा कप्पान्ना पुजारी, वय ३५ वर्षे, रा उमराणी, ता चिक्कोडी, राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले. नमूद वाहन चालकास त्याचे कडे वाहनांमध्ये कोणता माल भरला आहे? तसेच त्याची बिल पावती आहे काय? तसेच तो कोवून आणला असून कोठे घेवून जाणार आहे याबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने सदर वाहनात विमल सुगंधी तंबाखू व पान मसाला भरला असून तो कुडची, राज्य कर्नाटक येथून भरला असून तो पंढरपूरला घेवून जाणार आहे तसेच लाल रंगाची टोयाटो इटीओस गाडी क्र. एम. एच. ०४ एफ. ए. ०१०२ मधून रोड दाखविण्याकरीता माड़झे समोर थोड्या अंतरावर जात आहे असे सांगितले. लागलीस थोड्या अंतरावर जावून पाहिले असता रोड कडेला लाल रंगाची टोकाटो इटीओस गाडी क्र. एम. एच. ०४ एफ. ए. ०१०२ ही संशयितरित्या थांबलेली दिसली. सदर गाडीतील चालकास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुनिल ज्ञानोबा शिंदे, वय ४२ वर्षे, रा नांदणी, ता शिरोळ, जि कोल्हापूर असे सांगितले. त्यास सदर आयशर माल वाहतुक गाडीतील सुंगधी तंबाखू व पान मसाल्याबाबत विचारले असता सदरचा माल हा चिक्कोडी मधील आण्णा (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांनी भरून दिला असून तो पंढपूर मध्ये देण्याकरीता पाठविले असल्याचे सांगितले.
लागलीच सदर वाहने व इसमांस कवठेमहांकाळ पोलीस ठाणेस नेवून पंकज पवार, सहा. पोलीस निरीक्षक यांनी पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल उतरून घेऊन त्याचा सविस्तर पंचनामा करून तो जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींवर कवठेमहांकाळ पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत.
मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर व मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी आगामी विधानसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने सांगली जिल्हयातील सर्व अवैध व्यवसायांवर कठोर कायदेशीर कारवाई करणेबाबत सर्व अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले असून ही कारवाई अशीच चालू ठेवणेबाबत निर्देशित केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com