गोंदिया स्था.गु.शा पोलीस पथकाने अवैध अग्नीशस्त्र बाळगून दहशत माजविनाऱ्यास अग्निषस्त्रासह केले जेरबंद..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- मा. पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांचे सुरक्षिततेच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था भंग करणाऱ्या तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत..


या अनुषंगाने दिनांक 19/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात रात्रगस्त कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई करत पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण हद्दीतील मौजा- पांढराबोडी शिवारात दिनांक- 18/10/2024 रोजी शारदा माता मिरवणुक दरम्यान एक इसम हा त्याचे जवळील अग्निशस्त्र लोकांकडे ताणुन त्यांच्या मनात भिती घालुन दहशत माजवत होता… परंतु त्याच्या भितीमुळे लोकांनी तक्रार दिली नाही अश्या प्राप्त माहिती वरुन अवैध शस्त्र बाळगणारा इसम नामे- 1) नामे- मनोज खेमलाल गराडे, वय 30 वर्षे रा. पांढराबोडी, ता. जिल्हा- गोंदिया
यास एका सिल्व्हर रंगाच्या लोखंडी एअर गन (अग्निषस्त्र) किंमती 10,000/- रूपये चे सह ताब्यात घेण्यात आले.
नमूद आरोपी याने लोकांचे मनात अग्निषत्राद्वारे भीती निर्माण करून दहशत पसरवीत असल्याने त्याने केलेल्या अवैध कृतीविरुद्ध कारवाई करत अवैध शस्त्र बाळगण्याबद्दल कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये पो.ठाणे गोंदिया ग्रामीण येथे गुन्हा नोंदविण्यात आले आहे. आरोपी यास गोंदिया ग्रामीण पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असुन पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत..
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचना प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पो. उप.नि. शरद सैदाने, अंमलदार राजु मिश्रा, महेश मेहर,भुवन देशमुख, नेवालाल भेलावे, कोडापे, घनश्याम कुंभलवार यांनी कारवाई केली आहे..
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com