शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर लाभ देण्याचे आमीष दाखवुन फसवणुक करणारे आरोपी अटक…

उपसंपादक-रणजित मस्के
जळगांव :-आरोपीकडुन जप्त केलेली 11,10,000/- रुपये रक्कम मा पोलीस अधीक्षक जळगाव यांचे हस्ते फिर्यादी यांना परत करण्यात आली.
सायबर पो.स्टे. भाग-5 गुरनं. 18/2024 भादवि क. 420,465,468, 34 सह IT Act कलम 66(d) प्रमाणे दाखल गुन्हयातील तक्रारदार यांना शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणावर नफा मिळेल असे आमिष दाखविले त्यासाठी त्यांनी सांगितलेल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले तसेच मोबाईलमध्ये शेअर ट्रेडिंगचे अॅप्लीकेशन इंन्स्टॉल करण्यास सांगितले त्यानंतर सुरुवातीला त्यांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणावर नफा दिला गेला. त्यानंतर तक्रारदारांनी मोठी रक्कम गुंतवणुक केल्या नंतर त्यांना झालेला नफा हा फक्त डिजीटली वेबसाईट व मोबाईल अॅप्लीकेशन मध्ये दाखविला जात होता. त्यानंतर त्यांना गुंतवणुकीची रक्कम काढण्यासाठी पुन्हा काही पैसे भरल्या नंतर ती रक्कम काढता येईल, असे विविध कारणे सांगुन तक्रारदार यांचेकडुन 1,05,23,341/ रुपयांची फसवणुक करण्यात आली होती.त्यानंतर त्यांनी साबयर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिली आहे.

सदर गुन्हयाचे तपासात मा. पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. अपर पोलीस अधीक्षक, जळगाव परिमंडळ यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे.चे पोलीस निलेश गायकवाड यांनी व त्यांचे अधिनस्त सायबर पो.स्टे. कडील तपास पथकाने 1) मुकेश पिता सुभाष, वय-26 2) अंकुश पिता सतपाल, वय-27, दोघे रा- गांव नादोरी, तहसिल भुना, जिल्हा फतेहाबाद, हरियाणा 3) दिपांकर गौतम पिता राजेंद्र वय 29 रा. रुम नं 08 तळ मजला, हनुमान प्रसाद बिल्डिंग, विजय मार्ग भायखळा पश्चिम. 4) नुरमोहम्मद अब्दुल रशिद बगे वय 24 मुळ रा. 05 साहील नगर गांधार पाले, आयडीयल इंग्लिश शाळेजवळ, महाड जि रायगड हमु. सुपारीवाला हॉल, दोनटाकी डंकन रोड, नागपाडा मुंबइ यातील आरोपी क्रमांक 1 व 2 यांना फतेहबाद हरीयाना येथुन तसेत आरोपी क्रं 3 व 4 यांना मुबई येथुन अटक करण्यात आली होती.
नमुद आरोपी हे फसवणुकीची रक्कम बँक खात्यावर स्विकारुन बँकेतुन कैश विड्रॉल करत होते. नमुद आरोपी यांचेकडुन 11,10,000/- रुपये रोख हे सायबर पोलीस स्टेशन जळगाव यांनी तपासात जप्त केले होते. सदरची 11,10,000/- रुपये ही फिर्यादी सोनल भिमराव उपलपवार यांना दि 14/10/2024 रोजी डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे हस्ते देण्यात आली आहे.
गुन्हयाचे तपासात प्राप्त माहितीचे आधारे निष्पन्न आरोपीतांना अटक करणेकामी मा. पोलीस अधीक्षक, जळगाव, श्री. अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव तसेच पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे कामी पोउपनि दिगंबर थोरात यांचे सोबत सफौ/2563 देवेंद्र जाधव, पोहेकॉ/2835 दिलीप चिंचोले, पोहेकॉ/1928 शिवनारायन देशमुख, व पोकॉ/197 दिपक सोनवणे अशांनी फतेहबाद हरीयाना, तसेच मुंबई येथे तपास पथक रवाना करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करत असुन गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन हे पोउनि दिगंबर थोरात, पोहेकॉ / 2835 दिलीप चिंचोले यांनी केले आहे.
नागरीकांना जाहीर आवाहन
तरी सायबर पोलीस स्टेशन जळगाव कडून जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक केल्यास मोठया प्रमाणावर नफा मिळतो असे आमिष दाखवुन नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवणुक करण्यास सांगितले जाते त्याबाबत नागरिकांना आव्हाहन करण्यात येते की फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप द्वारे प्राप्त होणारे शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीचे येणार मॅसेज यांना बळी पड्डु नये व असे कोणतेही गुंतवणुकीचे अॅप्लीकेशन तसेच वेबसाईट वर आपले खाते रजिस्टर करु नये जर आपली फसवणुक झाल्यास आपण सायबर पोलीस स्टेशन येथे फोन क्रं.0257-2229695 यावर संपर्क करावा. तसेच सायबर फ्रॉड झाल्यास तात्काळ 1930 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क करावा अथवा Cybercrime.gov.in यावर ऑनलाईन तक्रार नोंदवावी.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com