विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभुमीवर मिरज पोलीस उपविभागातर्फे मिटींगचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
बेळगांव ;
मिरज शासकीय विश्रामगृह येथे ११.३० या ते १३.३० या वेळेत अथणी सब डिव्हिजन बेळगाव जिल्हा, जयसिंगपुर उपविभाग कोल्हापुर यांचेत महाराष्ट्र कर्नाटक आंतर राज्य बॉर्डर समन्वय गिटीग सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी एएसपी श्रीमती विमला मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सदर मिटींगमध्ये निवडणुकीचे अनुषंगाने आतर राज्य व आंतर जिल्हा चेक पोस्ट चालु करणेत येवुन सीमावर्ती भागातुन दारु, गुटखा इतर अंमली पदार्थाची अवैधपणे होणारी वाहतुकीवर सीमावर्ती भागातील पोलीस ठाणेत समन्वय साधुन प्रभावीपणे कारवाई करुन या पदार्थाची अवैध वाहतुकीवर आळा घालणे, तसेच क्रियाशिल गुन्हेगार आंतरजिल्हा/आंतरराज्य गुन्हे करणारे गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार फरार पाहीजे असलेले गुन्हेगार, नॉन बेलेबल वॉरंन्ट या मधील आरोपींची आदान प्रदाण करणे, सीमावर्ती भागातील पोलीस स्टेशनकडून संयुक्तपणे आरोपींची शोध मोहीम राबविणे, अन डिटेक्ट मर्डर, मधील संशयीत आरोपी बाबत माहीती देणे निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्था चे अनुषंगाने घडणा-या घडामोडीवरती लक्ष ठेवुन प्रभावीपणे अंमलबाजावणी करणे या विषयावर सविस्तर चर्चा करणेत आली.



सदर मिटींग करीता अथणी सबडिव्हीजन चे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत मनोळी मिरज उपविभागचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा, जयसिंगपुर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहीणी साळंखे, मिरज ग्रामीण पो. ठाणे पोलीस निरीक्षक श्री भैरव तळेकर, मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, महात्मा गांधी चौक पो. ठाणे सहा. पोलीस निरीक्षक कळेकर, तसेच कोल्हापुर जिल्हयातील जयसिंगपुर, शिरोळ, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी कागवाड पो. ठाणे जि. बेळगाव चे प्रभारी अधिकारी तसेच डी.बी.चे अधिकारी, गोपनीय व क्राईमचे पोलीस अंमलदार मिटींग करीता उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com