पुणे ग्रामीण पोलिस दल स्मृतिचिन्ह अनावरण सोहळा मा.चंद्रकांत पाटील आणि मा. उषा लक्ष्मण यांच्या हस्ते संपन्न…

प्रतिनिधी-रणजित मस्के
पुणे: व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या, कॉमन मॅन आणि पोलीस यांच्या एका चित्रावर आधारित शिल्प पुणे ग्रामीण पोलीस दलाने स्मृतीचिन्ह म्हणून स्वीकारले आहे.
त्याचे अनावरण मा. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि श्रीमती उषा लक्ष्मण यांचे हस्ते करण्यात आले. लोकशाहीमध्ये कोणतेही पोलीस दल हे सामान्य नागरिकांच्या सहकार्याशिवाय आपले कार्य पार पडू शकत नाही. कॉमन मॅन अँड पोलीस यांच्यातील बंध या शिल्पामुळे निश्चितच वृद्धिंगत होतील.
आपल्या न्यायदान प्रक्रियेमध्ये, अत्यंत दुर्लक्षित असा घटक म्हणजे साक्षीदार. पीडित व्यक्तीला तरी स्वतःला संपूर्ण प्रक्रियपासून न्याय हवा असतो पण साक्षीदारासाठी संपूर्ण न्याय प्रक्रिया ही अतिशय त्रासदायक असते. स्वतःचा वेळ ,ऊर्जा, पैसे खर्च करून बचाव पक्षाच्या वकिलांची उलट तपासणी, वेळकाढूपणा आणि वेगवेगळी दबाव-तंत्र यांचा सामना करत कोर्टामध्ये न्यायाचे बाजूने साक्ष देणे हा एक मोठा सत्याग्रहच म्हणावा लागेल.


असे सत्याग्रही साक्षीदार हे कॉमन मॅन मधील पोलिसच आहेत या भावनेतून ,त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कोणी रिक्षावाला तर कोणी शेतकरी ,कोणी खानावळ चालवणारा, तर कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर… या सर्वांची सामाजिक बांधिलकी आणि सत्याची चाड यामुळे पीडितांना न्याय मिळणे शक्य झाले.


तसेच कोविड चा सामना करताना पोलिसांसह खांद्याला खांदा लावून लढताना प्राण गमावणाऱ्या पोलीस पाटील यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान वाटप मा. पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com