“सिरियल किलर” विनोदी नाटकाचे मा.खा.श्री. नारायण राणे ह्यांचे हस्ते शुभारंभ…

प्रतिनिधी-महेश वैद्य
मुंबई :- “सिरियल किलर “धमाल विनोदी आजच्या जीवनशैलीवर आधारीत, शेवटपर्यंत नाट्यमयरीत्या खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या नाटकाचे, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवाजी मंदीर नाट्यगृहात खासदार आदरणीय श्री नारायण राणे ह्यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन व नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आले.

त्यावेळी MS – CIT (आय टी फील्ड) क्षेत्रातील एल. एल. सी. मुंबई चे श्री वैभव जोशी सर, आणि आम्ही सर्व ए. एल. सी. ह्या नाटकाचं आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिलो.
नवीन व्यवसायात पदार्पण करणारे आमचे सिंधुदुर्गातील एल. एल. सी. निर्माता – श्री. प्रणय तेली, लेखक – दिग्दर्शक श्री. केदार देसाई ह्यांना नाट्यक्षेत्रातील उज्वल भवितव्यासाठी मुंबई एल. एल. सी. च्या वतीने पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आले.
मुख्य भूमिकेत असणारे कॉमेडीचा शार्प शूटर भाऊ कदम आणि अश्विनी कुलकर्णी. सोबतचे अविस्मरणीय क्षणचित्र.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com