जव्हार व डहाणू तालुक्यात वीज पडून 7 व्यक्ती जखमी

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :- दि. 13 ऑक्टोंबर रोजी सझा आपटाळे पैकी केळीचा पाडा ता. जव्हार येथे दुपारी 4.30 वाजता 5 जणांना विजेचा झटका (वीज पडून) झखमी झाले आहेत त्या पैकी
- गंगाराम बाळू मौळे वय ५५
- रवींद्र अनंता भोये वय 353. हितेश भास्कर भोई वय 22
हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या वर शासकीय रुग्णालय जव्हार येथे उपचार चालू आहे
व - ओंकार गंगाराम मौळे वय 22
- अमरीश कुमार वय 24 यांना जास्त जखमी असल्याने त्याला ठाणे येथे उपचारासाठी रवाना केले आहे
आणि
दिनांक 14.10.2024 रोजी डहाणू तालुक्यातील धरमपुर गावात शेतात दुपारी वीज पडून वीजेच्या तरंगामुळे 2 महिला जखमी (जळलेल्या नाहीत) झालेल्या आहेत. सदर महिलांना तंद्री आपल्यासारखे वाटणे. मळमळल्यासारखे वाटणे या प्रकारामुळे त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयातून वेदांत रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी हलविण्यात आले आहे.त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. - ज्योती महेश पर्हाड वय 27
- वंदना संजय भगत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com