स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी देशी बनावटीचे अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमास केली अटक…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :- ५०,८००/- रु. किंमतीचे अग्निशस्त्र व २ जिवंत काडतुस केले हस्तगत.
कुरळप पोलीस ठाणे
अपराध क्र आणि कलम
गु.र.नं. १८१/२०२४, भारतीय हत्यार अधिनियम १९५९ चे कलम
३, २५ गु.दा.ता वेळ
ता. १२/१०/२०२४ रोजी
फिर्यादी नाय
अभिजीत दिगंबर ठाणेकर, पोशि/५७६ नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली
माहिती कशी प्राप्त झाली
मु.घ.ता वेळ दि. १२/१०/२०२४ रोजी
पोह/कुबेर खोत पोशि / रोहन घस्ते
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली.
यांचे मार्गर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा,सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, स्था. गु. अ. शाखा,
पोहेकों / सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरूण पाटील,
पोशि / अभिजीत ठाणेकर, दिपक गट्टे, रोहन घस्ते, सुनिल जाधव, प्रमोद साखरपे सायबर पोलीस ठाणेकडील पोशि / अजय पाटील, करण परदेशी, विवेक साळुंखे
अटक दिनांक दि. १२/१०/२०२४
रोजी आरोपीचे नांव पत्ता
नयन लक्ष्मण पाटील, वय २१ वर्षे, रा नारायणटेक टोप, ता हातकणंगले, जि कोल्हापूर जप्त मुद्देमाल
१. ५०,०००/- रु किमतीचे लॉखडी धातुचे देशी बनावटीचे ०१ पिस्टल मॅग्झीनसह जु. या. कि. अं. २. ८००/- रु. किंमतीचे ०२ जिवंत राऊड.
५०,८००/- (पन्नास हजार आठशे रुपये मात्र)
गुन्हाची थोडक्यात हकीकत मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने दि. १२/१०/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सायंत यांचे पथकातील पोहेकों कुबेर खोत व पोशि अभिजित ठाणेकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम इटकरे फाटा येथे येणार असून त्याचे कब्जात पिस्टल आहे.
नमूद पथकाने मिळाले चातमीप्रमाणे इटकरे फाटा येथे वॉच केला असता एक इसम बातमीप्रमाणे थांबलेला दिसला, तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १) नयन लक्ष्मण पाटील, वय २१ वर्षे, रा नारायणटेक टोप, ता हातकणंगले, जि कोल्हापूर असे असल्याचे सांगितले. सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याचे अंगड़ाडतीचा उददेश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे पेंटचे खिशात देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झीनसह व २ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याचेकडे देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणे बाचत त्याचेकडे परवाना आहे का याचाबत विचारणा केली असता त्या चाबत त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपासकामी सहा. पोलीस निरीक्षक नितीन सायंत यांनी पंचासमक्ष जप्त करुन आरोपी विरुध्द पोशि/अभिजीत ठाणेकर यांनी कुरळप पोलीस ठाणे येथे
फिर्याद देवून भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कुरळप पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास कुरळप पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com