आदी जैन युवक ट्रस्ट तर्फे गोशाळांना गो निवास शेडचे लोकार्पण…

उपसंपादक-उमेद सुतार
पुणे :- भारतीय राज्यघटनेच्या कलम ४८ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र शासनाने १९७६ च्या प्राणी रक्षण कायदा राज्यात लागू केला.




त्यानंतर ४ मार्च २०१५ रोजी गोहत्या प्रतिबंधक महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम लागू करण्यात आला. या सुधारित कायद्यानुसार दुधासाठी व पैदाशीसाठी, ओझी वाहण्याच्या कामासाठी व किंवा शेतीविषयक प्रयोजनासाठी उपयुक्त असलेल्या गाईंची, वळूंची व बैलांची कत्तल करण्यास मनाई करणे आणि त्यांचे रक्षण करणे क्रमप्राप्त झाले.
सदर कारणामुळे होणारी बेकायदेशीर कत्तल रोखून पोलीस खात्याने पकडलेल्या गोवंशाची रवानगी गोशाळेत करण्यात येत आहे. यामुळे गोशाळेमध्ये असे गोधन सांभाळण्यासाठी वाढीव पशु आवासाची तातडीने आवश्यकता भासत असलेले पुणे (झेंडेवाडी) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षण दल ट्रस्ट गोशाळा व बोरीपार्धी येथील बोरमाळनाथ गोशाळेच्या मागणीवरून अनुक्रमे मुंबई येथील श्री आदिजीन युवा संघाचे प्रेरणेने दानदाते श्रीमती कोकिळाबेन नवीनचंद्र महेता परिवार (डी. नवीन अँड कंपनी) व तसेच श्री चंदुलाल दामोदरदास बोरा व श्रीमती मधुबेन चंदुलाल बोरा यांचे आर्थिक सहयोगाने गोमाता आवास निर्माण करून आदी जीन युवक चॅरिटेबल चे संस्थापक व मॅनेजिंग ट्रस्टी श्री जयेश भाई शहा व ट्रस्टी श्री नवीन भाई गाला, कार्यकारणी सदस्य श्री दिनेशभाई व उदयभाई यांच्या आगेवाणीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष मंत्री महोदय नामदार श्री शेखरजी मुंदडा व समस्त महाजन संस्थेचे महाराष्ट्राचे समन्वयक श्री रमेशभाई ओसवाल यांचे हस्ते तसेच महाराष्ट्रातील अग्रणी गोशाळा संचालक, गोरक्षक , गोपालक श्री शिवाजीराव गरुड, श्री सचिन महाराज गुरव, श्री कैलाश आबा शेलार, श्री पंडितराव मोडक, इ. चे पावन सान्निध्यात गो निवास शेड चे लोकार्पण करण्यात आले. ह्या प्रसंगी हिंदू हृदय सम्राट मा. पंडीत राव मोडक यांचे मारगदर्शनाखाली तयार झालेल्या गो रक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सदर ट्रस्ट तर्फे कोयाळी (चाकण) येथील श्री दिपकभाऊ निकम यांचे आचार्य श्री विनोबा भावे गोशाळेस चारा कट्टर भेट देण्यात आला ज्यामुळे चाऱ्याची २० ते ३० % बचत होऊन गोधनास चारा पचनास मदत होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com