आमगाव, पोलीसांची नवरात्रोत्सव..व.. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-मगाव हद्दीतील अट्टल गुन्हेगार दोन महिन्याकरीता आमगाव उपविभाग अंतर्गत क्षेत्र तालुका देवरी, आमगाव, सालेकसा हद्दीबाहेर हद्दपार

पो.ठाणे आमगाव अंतर्गत हद्दीतील अट्टल गुन्हेगार नामे-
1) मनोहर योगेश्वर फरकुंडे राहणारा भोसा तालुका – आमगाव जिल्हा- गोंदिया*
2) मधु हिरामणजी मारवाडे राहणार – कालीमाटी तालुका – आमगाव जिल्हा- गोंदिया
अशी हद्दपार करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगारांची नावे असून या दोघांना आमगाव उपविभाग अंतर्गत हद्दीतून तसेच तालुका देवरी, सालेकसा हद्दीतून दोन महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे..
पोलीस अधीक्षक गोंदिया, यांचे निर्देशान्वये जिल्ह्यातील नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवरात्रोत्सव व आगामी होणारी विधानसभा सार्वत्रीक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था अबाधीत राहावी, वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा गुन्हेगारांवर वचक बसावा, तसेच गुन्हेगाराचे गुन्हेगारी प्रवृत्तीना कोणताही थारा दिला जात नाही हा संदेश जनमानसात जावा म्हणुन कारवाई करण्यात आली आहे.
अट्टल गुन्हेगार नामे – 1) मनोहर योगेश्वर फरकुंडे रा. भोसा हा काहीही कामधंदा करित नसून चोरी, घरफोडी करुन आपले उदरनिर्वाह करतो. सन 2010 पासून चोरी करणे, रात्रीची घरफोडी करणे, घातक हत्याराने दुखापत करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृती करणे, अवैधपणे गौण खनिजाची वाहतूक व विक्री करणे, विनापरवाना शस्त्र वापरणे व शासकीय कामात अडथळा आणून शासकीय सेवकांना मारहाण करणे अश्या सदराखाली 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत..
तसेच गुन्हेगार नामे – 2) मधु मारवाडे रा- कालीमाटी हा ढाबा चालवीत असून ढाब्याच्या सहयाने अवैधरित्या देशी दारु बाळगून विक्री करणे गावात दहशत निर्माण करुन लोकांना धमकाविने अश्या प्रकारचे गुन्हे नोंद असुन याचे बेकायदेशीर दारु विक्रीमुळे परिसरातील जनता त्रस्त झाली असुन अनेक लोक व्यसनाधिन झाले आहेत. दारु पिणाऱ्यांमध्ये आप आपसात भांडणे, वाद होवून, मारामारी होतात. त्याचा विपरीत परिणाम शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनावर होत आहे. तसेच गावातील लोकांवर त्याचा उपद्रव होत असतो.
अश्या नमूद अट्टल गुन्हेगारी प्रवृत्तीच्या धोकादायक इसमाचे कृतीवर पायबंद घालण्यासाठी यांचे विरुद्ध ठाणेदार आमगाव यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56 (1) (अ)(ब) अन्वये हद्दपार प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देवरी यांना सादर केलेला होता. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देवरी यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव यांनी विहीत मुद्दतीत दोघांचे हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पुर्ण करुन नमुद सराईत गुन्हेगाराना गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्हा हद्दीतुन 2 वर्षाकरीता हदपार करण्याची शिफारस केली होती. अखेर उपविभागीय दंडाधिकारी, देवरी कविता गायकवाड यांनी नमुद दोन्ही सराईत गुन्हेगाराचे हद्दपारीचे आदेश काढुन 02 महिण्याच्या कालावधी करिता आमगाव उपविभाग व देवरी तालुका, सालेकसा तालुका हद्दीतुन हद्दपार केले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, साहेब, गोंदिया कॅम्प देवरी, याचे निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मडामे याच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक श्री. तिरुपती राणे पो.ठाणे आमगाव, पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, स्थागुशा यांचे मार्गदर्शनात पो. अंमलदार रामचंद चौधरी, राजु पंधरे, विवेक कटरे, विनिषा बाहेकर, यशोदा नाईक पो.स्टे. आमगांव तसेच प्रतिबंधक विभाग गोंदिया मपोउपनि वनिता सायकर,अंमलदार प्रकाश गायधने दुर्गेश तिवारी यांनी कार्यवाही पार पाडली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com