गोंदिया शहर पोलीस ठाणे यांनी हद्दीतील ७ सराईत गुन्हेगारांना केले तडीपार…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने गोंदिया शहर पोलीस ठाणे अॅक्शन मोडवर..!
गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगार क्र. १) इमरान मुस्ताक शेख वय २९ वर्ष, रा. सुंदरनगर, भिमनगर, गोंदिया याचे विरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे खुन, खुनाचा प्रयत्न, धमकी, गैरकायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे, विनापरवानगी शस्त्र बाळगणे, जुगार या सारखे ५ गंभीर गुन्हयांची, सराईत गुन्हेगार क्र. २) कोमल रमेश बनकर , वय ३० वर्ष, रा. चावडी चौक, छोटा, गोंदिया याचे विरूध्द गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, रावणवाडी व साकोली जि. भंडारा पोलीस ठाणे येथे दरोडा घालण्यासाठी एकत्र जमून तयारी करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून गैरपणे परिरुध्द करुन जिवे मारण्याची धमकी देणे, चोरी, जुगार, दखलपात्र गुन्हा करण्याच्या हेतुने संशयास्पद मिळून येणे, अंमली पदार्थ अधि. असे एकूण १४ दखलपात्र व अदखलपात्र गंभीर गुन्हे, सराईत गुन्हेगार क्र. ३) धर्मराज ऊर्फ धर्मा दाजीबा बावणकर , वय ३२ वर्ष, रा. गौतमनगर, वाजपायी वार्ड, गोंदिया याचे विरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे खुन, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, बलादग्रहणाबद्दल शिक्षा, राहते घरात चोरी, दंगल-मारामारी या सारखे ८ गंभीर गुन्हे, सराईत गुन्हेगार क्र. ४) मुकेश ऊर्फ डाव विनोद तांडेकर , वय ३४ वर्ष, रा. गौतमनगर, वाजपायी वार्ड, गोंदिया याचे विरूध्द पो.स्टे. गोंदिया शहर येथे दुखापत, बलात्कार, अपनयन, जबरी चोरी, दरोडा, जुगार, शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, धमकी देने, विनयभंग, हमला, अवैध्द शस्त्र बाळगणे, बलादग्रहण, स्पोटक पदार्थ द्वारे आगळीक या सारखे १० गंभीर गुन्हे, सराईत गुन्हेगार क्र. ५) जय ऊर्फ दहु प्रविण भालाधरे वय २३ वर्ष, रा. सिंगलटोली, आंबेडकर वार्ड, गोंदिया याचे विरूध्द पो.स्टे. गोंदिया शहर, रामनगर, लोहमार्ग गोंदिया येथे जबरी चोरी, दरोडा, चोरी, घरफोडी, गैरकायद्याची मंडळी, अवैध शस्त्र बाळगणे, दुखापत या सारखे ९ गंभीर गुन्हे, सराईत गुन्हेगार क्र. ६) प्रमोद हिरामण गजभीये, वय ५० वर्ष, रा. लक्ष्मीनगर, गोंदिया याचे विरूध्द पोलीस ठाणे गोंदिया शहर, गोरेगाव, आमगाव, नवेगाव बांध, रावणवाडी अभिलेखावर गैरकायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे, दारूच्या नशेत धुमधाम करणे, शासकीय मालमत्ता विद्रुपीकरण करणे, सरकारी कर्मचाऱ्यावर हमला, खंडणी मागणे, दुखापत करून पुन्हा मारहाण करण्याची धमकी देवुन अपहरण करणे, अनाधिकृत गृहप्रवेश करून अपहरण करणे, चोरी करणे असे एकुण ११ दखलपात्र व २ अदखलपात्र असे एकुण १३ गुन्हे, सराईत गुन्हेगार क्र. ७) जय सुनिल करीयार, वय ४६ वर्ष, रा. हनुमान मंदीर समोर, दसखोली, गोंदिया, याचे विरोधात पो.स्टे. गोंदिया शहर, रामनगर, लोहमार्ग गोंदिया येथे जबरी चोरी, दुखापत, घरफोडी, चोरी, गैरकायदा मंडळी जमवुन दुखापत करणे, दरोडा, खुनाचा प्रयत्न, अश्लिल कृती करणे असे एकुण २४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नमुद सराईत गुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य लोकांचे मनात दहशत निर्माण झालेली होती. गोंदिया शहरात शांतता व सुव्यवस्था राहुन सर्वसामान्य जनतेला भयमुक्त जिवण जगता यावे तसेच आगामी विधानसभा निवडणुक शांततेत पार पडावी याकरीता गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक यांनी सदर सराईत गुन्हेगारांना गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्हयातुन तडीपार करण्याकरीता कलम ५६ व ५७ महाराष्ट्र पोलीस अधिनीयमान्वये मा. उपविभागीय दंडाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयात प्रस्ताव सादर केलेला होता.

सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री. चंद्रभान खंडाईत, उपविभागीय दंडाधिकारी गोंदिया यांनी प्रस्तावाची शहानिशा व चौकशी करून सराईत गुन्हेगार क्र. १) इमरान मुस्ताक शेख वय २९ वर्ष, रा. सुंदरनगर, भिमनगर, गोंदिया, २) कोमल रमेश बनकर, वय ३० वर्ष, रा. चावडी चौक, छोटा, गोंदिया, ३) धर्मराज ऊर्फ धर्मा दाजीबा बावणकर, वय ३२ वर्ष, रा. गौतमनगर, वाजपायी वार्ड, गोंदिया, ४) मुकेश ऊर्फ डाव विनोद तांडेकर, वय ३४ वर्ष, रा. गौतमनगर, वाजपायी वार्ड, गोंदिया, ५) प्रमोद हिरामण गजभीये, वय ५० वर्ष, रा. लक्ष्मीनगर, गोंदिया, ६) जय सुनिल करीयार, वय ४६ वर्ष, रा. हनुमान मंदीर समोर, दसखोली, गोंदिया यांना दिनांक ३/१०/२०२४ व ४/१०/२०२४ रोजी आदेश काढून ३ महीन्याकरीता तसेच सराईत गुन्हेगार क्र. ७) जय ऊर्फ बहु प्रविण भालाधरे वय २३ वर्ष, रा. सिंगलटोली, आंबेडकर वार्ड, गोंदिया यास दिनांक ३/१०/२०२४ रोजी आदेश काढून ६ महीन्याकरीता गोंदिया, भंडारा व बालाघाट या जिल्हयातुन तडीपार केले आहे. नमुद तडीपार आरोपी हे हद्दपार कालावधी दरम्यान मिळून आल्यास त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच यापुढे सुध्दा गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांविरुध्द तडीपार व एमपीडीए अंतर्गत ची कारवाई अशीच पुढे सुरु राहील असे गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते यांनी सांगितले आहे. सदर कारवाईमुळे गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतील आरोपीतांचे धाबे दणाणले आहेत.
सदर सराईत गुन्हेगारांना जिल्हयातून तडीपार करण्याकरीता पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते व डी.बी. पथकातील पो.हवा. जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, निशिकांत लोंदासे, दिपक राहांगडाले, प्रमोद चव्हाण, मपोहवा रीना चव्हाण, पो.शि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाणे, मुकेश रावते, कुणाल बारेवार व अशोक राहांगडाले यांनी मोलाची कामगीरी बजावली आहे. विशेष म्हणजे यापुर्वी गोंदिया शहर पोलीसांनी मागील ३ महिन्यात गोंदिया जिल्हा पोलीस ठाणे हद्दीतील ४ सराईत गुन्हेगारांना गोंदिया जिल्हयातुन तडीपार व एका सराईत गुन्हेगारास एमपीडीए कायदयांतर्गत स्थानबध्द करण्यात यश आलेले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com