देवरी पोलीसांची धडाकेबाज कारवाई गांजा तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी केली गजाआड…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- उपविभाग देवरी अंतर्गत अवैध धंदयावर कारवाई करण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. गोरख भामरे व मा. अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. नित्यांनद झा यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेक पाटील यांनी उपविभाग देवरी अंतर्गत अवैध धंदयावर कारवाई करण्याकरीता विशेष अभियाण राबविले असुन दि. ०५/१०/२०२४ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री. विवेक पाटील यांना गोपनिय सुत्रांकडुन माहीती मिळाली की, गांजा वाहतुक करणारी एक आंतरराज्यीय टोळी छत्तीसगड राज्याकडुन महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरुन गांजा वाहतुक करणार आहे.

मिळालेल्या माहीतीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेक पाटील यांनी पो.स्टे. देवरी येथील सपोनि, गंगाकाचुर यांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेशीत केले. सपोनि गंगाकाचुर व सोबत पो.स्टे. देवरी येथील पोलीस अंमलदार, महामार्ग पोलीस मदत केंद्र डोंगरगाव येथील पोउपनि दिनेश लिल्हारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देवरी येथील पोउपनि गुट्टे व पोलीस अंमलदार यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील ग्राम शिरपुरबोध आर.टी.ओ. चेक पोस्ट येथे नाकाबंदी लावुन वाहनांची तपासणी सुरु केली असता स्विफ्ट डिझायर वाहन क्र.आर.जे.-०८-टी.ए.-१८३६ मध्ये एकुण १२६.१४ किलो ग्रॅम किंमती एकुण १८,९२,१००/- रु (अक्षरी-अठरा लक्ष व्यानऊ हजार शंभर) किंमतीचा ओलसर गांजा (अंमली पदार्थ) अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आले.
सदर प्रकरणी ०२ आरोपी विरुध्द पो.स्टे. देवरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांनतर गांजा वाहतुक करणा-या टोळीमधील इतर ०२ आरोपीताना ०१ चारचाकी वाहनासह स्था.गु.शा. गोंदिया यांचे मदतीने पकडण्यात आले. सदर गुन्हयात एकुण ०४ आरोपी अटक असुन गुन्हयात ०२ चारचाकी वाहनासह एकुण २९,१३,६००/-रु (अक्षरी एकोनत्तीस लाख तेरा हजार सहाशे) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. प्रविण डांगे पो.स्टे. देवरी हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com