स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यानी मिरजेत गोवा बनावटीची विदेशी दारू केली जप्त..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-पोलीस स्टेशन
अपराध क्र आणि कलम
फिर्यादी नाय
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
गु.र.नं. ४६२/२०२४, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ड) प्रमाणे.
इवान मन्सूर मुल्ला, पोना/४२९ नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली
गु.दा.ता वेळ
माहिती कशी प्राप्त झाली
दि. ०२/१०/२०२४ रोजी
ता. ०२/१०/२०२४ रोजी
पोहेकों/इम्रान मुल्ला पोहेको/संकेत मगदूम
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. यांचे मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, पोहेकों / अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, इम्रान मुल्ला, बाबासाहेब माने पोना / अनंत कुडाळकर, पोशि / सोमनाथ पतंगे
अटक दिनांक दि. ०२/१०/२०२४ रोजी
आरोपीचे नांव पत्ता
प्रकाश यशवंत खोत, वय ५२ वर्षे, रा शिवशंकर वसाहत, सुभाषनगर, मिरज.
जप्त मुद्देमाल १. ३९,५६०/- रु गोवा बनावटीची विदेशी दारू ७५० मिलीच्या १६३ बाटल्या कि. अ.
२. १,६५०/- रु गोवा बनावटीची विदेशी दारू १८० मिलीच्या ११ चाटल्या कि, अ
४१,२१०/- (एकेचाळीस हजार दोनशे दहा रुपये मात्र) गुन्हयाची धोडक्यात हकीकत-
श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी महात्मा गांधी जयंती ड्राय डे चे अनुषंगाने अवैध व्यवसायांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे पथक तयार करून ड्राय डे चे अनुषंगाने अवैध धंद्याची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते. त्या अनुशंगाने दि. ०२/१०/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोहेकों/इम्रान मुल्ला व पोहेकों/संकेत मगदूम यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इसम नामे प्रकाश खोत, रा सुभाषनगर, मिरज हा याच्या राहत्या घरासमोर गोवा चनावटीची विदेशी दारू विक्री करीत आहे.

नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे, सुभाषनगर येथील प्रकाश खोत याचे घराजवळ जावून चाँच केला असता बातमीप्रमाणे एक इसम लाल रंगाची गोणी घेवून बसलेला दिसला संशयास्पद त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने जवळ जावून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रकाश यशवंत खोत, यय ५२ वर्षे, रा शिवशंकर वसाहत, सुभाषनगर, मिरज असे असलेचे सांगितले. सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी त्याचे कब्जात असलेल्या गोणी तपासून पाहिल्या असता, गोवा बनावटीची विदेशी दारू मिळून आली. त्याचेकडे याबाबत अधिक तपास केला असता पंचासमक्ष त्याने घराचे पाठीमागे झाडीमध्ये लपवून ठेवलेला दारू माल काढून दिला. त्यास सदर दास मालाचाबत विचारले असता त्याने सदरचा दास माल हा गोवा येथून खरेदी करून आणला असल्याचे सांगितले.
लागलीच सदर विदेशी दारुच्या बाटल्या सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त करून मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस याचाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com