गोंदिया शहर डी.बी. पथकानेसायकली चोरी करणारा चोरटा चोरीच्या 6 सायकलीसह केला जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- फियांदी श्री. प्रकाश रामलाल पुंडे, वय ४१ वर्षे, रा. शिवाजी नगर, सेलटॅक्स कॉलोनी फुलचुरटोला गोंदिया यांच्या मुलाची डी.एन. एस.एम.एस. स्कॉट कंपनीची काळया रंगाची सायकल किं. ६५००/- रु. ची फिर्यादीची पुतणी हीने दि. २/९/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. सुमारास नगर परिषद गोंदिया येथे ठेवून शारदा वाचनालय गोंदिया येथे गेली व दुपारी १.३० वा. सुमारास परत येवून पाहीले असता सदरची सायकल त्याठिकाणी दिसली नाही. सायकलचा शोध घेतला असता मिळुन आली नसल्याने दि. ६/१०/२०२४ रोजी अज्ञात आरोपीविरुध्द गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे अप.क्र. ६२५/२४ क. ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.



गोंदिया शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनात डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हा दाखल होताच गोपनिय माहीतीच्या आधारे पो.स्टे. गोंदिया शहर अभिलेखावरील आरोपी नामे- मंगेश जयलाल राऊत, वय ३२ वर्ष रा. सावित्रीबाई वार्ड कुंभारेनगर गोंदिया यास जेरबंद त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी विचारपूस तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल करुन पो.स्टे. परीसरातुन वेगवेगळया कंपनीच्या ६ सायकली चोरी करुन पैकनटोली गोंदिया येथील सुनसान ठीकाणी असलेल्या एका पडक्या घरात लपवून ठेवल्याचे सांगितल्याने सदर ठीकानी गुन्हयातील चोरीस गेलेली १) काळ्या रंगाची डी.एन.एस. एम. एस.स्कॉट कंपनीची सायकल कि. ६५००/-रु तसेच वेगवेगळया ठीकाणातुन चोरलेल्या २) काळ्या रंगाची हिरो स्प्रिंट स्टिकर लावलेली अं.कि.५०००/-रु. (३) लाल रंगाची VEERA नावाचे स्टिकर लावलेली समोर पिंजारा असलेली अं.कि.३०००/-रु. (४) काळ्या रंगाची हिरो कंपंनीची हिरो स्प्रिंट माँन्क गेअर असलेली सायकल अं. कि. ८०००/- रु. (५) लाल रंगाची सनराईड स्टिकर लावलेवी जिचा समोर पिंजरा असलेली सायकल अं.कि.४०००/-रु. (६) काळ्या रंगाची युनेक्सटर स्टिकर लावलेली अं.कि.५०००/-रु. अशा एकुण कि. ३१,५००/- रु. च्या ६ नग सायकली दि. ७/१०/२०२४ रोजी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

आरोपीस दि. ७/१०/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून याने यापुर्वी दोन-तिन महिन्या अगोदर दुर्गा चौक गोंदिया येथुन एक मोटार सायकल सुध्दा चोरी केली होती.

सदरची कामगीरी मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री साहील झारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पो.हवा. जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, मपोहवा रीना चव्हाण, पोशि. सुभाष सोनवाने, मुकेश रावते, दिनेश बिसेन, कुणाल बारेवार व अशोक राहांगडाले यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट