अंमली पदार्थ गांजाची खेप घेवून जात असताना एकास स्था.गुन्हे शाखा गोंदियाने केले जेरबंद..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-5 किलो गांजा, एक ज्यूपिटर मो. सा. व ईतर साहित्य असा किंमती 2 लक्ष 9 हजार 300/- रुपयाचा मुद्देमाल जप्त,
दिनांक- 07/10/2024 रोजी रात्र दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे पो. ठाणे रावणवाडी हद्दित अवैध धंदे, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना रात्री अंदाजे 01.30 वाजता चे सुमारास मौजा- दासगाव ते माकडी जाणाऱ्या रस्त्यावर एक ईसंम Jupiter मोटार सायकलवर संशयास्पद स्थितीत दिसून आल्याने त्यास थांबवून त्याची चौकशी विचारपूस केली असता… ईसंम नामे – घनश्याम टोलीराम तुरकर वय 57 वर्षे रा. तेढवा ता. जिल्हा गोंदिया असे सांगीतले… त्याचे ताब्यातील ज्यूपिटर गाडीवर मधल्या मोकळ्या जागेत एक प्लास्टिक बोरी दिसून आल्याने सदर बाबत चौकशी केली असता उडवा उडविचे उत्तरे देत असल्याने बोरीची पाहणी केली असता प्लास्टिक चे बोरीत प्लास्टिक वेस्टन असलेले 5 पॉकिट दिसून आले…..त्यापैकी एक वेस्टन असलेले पाकिट् उघडले असता हिरव्या रंगाचा ओलसर गांजा दिसून आल्याने जप्तीची सविस्तर प्रक्रिया करण्यात आली..*

ईसंम नामे-घनश्याम टोलीराम तुरकर रा. तेढवा याचे ताब्यातून 5 किलो गांजा, एक ज्यूपिटर मो. सा. मोबाईल व ईतर साहित्य असा किंमती एकूण 2,09,300/- (दोन लक्ष नऊ हजार तीनशे रूपयाचा मुद्देमाल)* जप्त करण्यात आलेला असुन आरोपी विरूध्द पोलीस ठाणे – रावणवाडी येथे एन. डी. पी. एस. कायदा कलम 8 (क), 20, 29 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.. आरोपीतास जप्त मुद्देमालासह रावणवाडी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे..पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया….गुन्ह्यांचा तपास रावणवाडी पोलीस करीत आहेत..
▪️सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात मपोउपनि- वनिता सायकर पोलीस अंमलदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, छगन विठ्ठले, घनश्याम कुंभलवार, यांनी कारवाई केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com