पोलीस आयुक्तालय नवी मुंबई
गुन्हे शाखा कक्ष -१ यांची धडक कारवाई, सोनसाखळी चोरांना ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

नवीमुंबई: सोमवार दिनांक १० ऑक्टोबर २०२२ नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा, कक्ष-१ चे पथकाकडून सोनसाखळी चोरी करणा-या दोन सराईत गुन्हेगारांना अटक, सोनसाखळी चोरीचे ०५ गुन्हयांची उकल करून एकुण ०३,०६,६००/-रू किमंतीचे ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने
हस्तगत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कोपरखैरणे, सानपाडा, नेरूळ पोलीस ठाणे हददीत मे व जून महिन्यात सोनसाखळी चोरीच्या घटनात वाढ झाली होती.त्याअनुषंगाने गुन्हेशाखा कक्ष-१ हे कोपरखैरणे पोलीस ठाणे गु.र.नं. २७७/२०२२ भादवि कलम ३९२,३४ अन्वये दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत होते.

सदर गुन्हयांचा समांतर तपास करून नवी मुंबई गुन्हे शाखा,कक्ष-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल शिंदे,यांनी सहा.पोलीस निरीक्षक हर्षल कदम, पोना/२०४९ दिपक मोरे, पोना/२८८३ निलेश किंद्रे. पोशि/४४४४ आशिष जाधव व पोशि/३८४३ विशाल सावरकर असे पथक तयार करून वरील दाखल गुन्हयातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करण्यात आली. नमूद पथकांने घटनास्थळ परिसरातील, तसेच आरोपी घटनास्थळी येण्याचा व चैन चोरी करुन जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करताना गुन्हयातील दोन इसम हे गुन्हा करताना होंडा युनिकॉर्न मोटार सायकलवरून येवून चैन जबरी चोरी केल्याचे दिसून आले. तसेच नमूद आरोपी हे गुन्हा केल्यानंतर मुंब्रा भागाकडे जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने आरोपी यांचे प्राप्त सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती प्राप्त केली असता सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील चैन जबरी चोरी करणारे आरोपी नामे
१) रिजवान ईस्माइल शेख व २)महमद आलम अस्लम करेशी असे असल्याचे समजले. त्याप्रमाणे सदर दोन्ही आरोपींचा शोध घेवून वर नमुद गुन्हयामध्ये दिनांक १८/०८/२०२२ रोजी अटक करण्यात आली.आरोपीतांकडे अटक मुदतीत सखोल तपास केला असता त्यांनी कोपरखैरणे,सानपाडा व नेरूळ भागात केलेल्या एकुण ०५ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहे.त्यांचेकडुन ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व चैन असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटार सायकल ही मुंब्रा पो. ठाणे गु.र.नं. ४५९/२०२२ भादवि कलम ३७९ या गुन्हयातील चोरी केलेली आहे.

अटक आरोपींची नावे
१)रिजवान ईस्माइल शेख वय ३७ वर्षे रा. सनराईज ग्लोरी टॉवर, ए /१४०३, शिळफाटा, अग्नीशमन केंद्रसमोर, शिळफाटा, मुंब्रा ता. जि. ठाणे
२) महमद आलम अस्लम कुरेशी वय २५ वर्षे रा. खान कम्पाउंड, दोस्ती टॉवरचे मागे, शिळफाटा, मुंब्रा, ता. जि. ठाणे •

हस्तगत मालमत्ता
०३,०६,६००/-रू किमंतीचे ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व चैन

महमद आलम अस्लम कुरेशी याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत

१)शिळ-डायघर पो.ठाणे गु.र.क १६२ /२०२१ भादवि कलम ३७९,३४.
२)तळोजा पो.ठाणे गु.र.क १५३ /२०१९ भादवि कलम ३७९,३४.
३) महात्मा फुले चौक, कल्याण पो. ठाणे गु.र.नं. २४२/२०२२ भादवि कलम ३९२,३४
४) महात्मा फुले चौक, कल्याण पो. ठाणे गु.र.नं. २४५/२०२२ भादवि कलम ३९२,३४
५) महात्मा फुले चौक, कल्याण पो. ठाणे गु.र.नं.३१६/२०२२ भादवि कलम ३९२,३४
६) महात्मा फुले चौक, कल्याण पो. ठाणे गु.र.नं. ३४८/२०२२ भादवि कलम ३९२,३४
७) महात्मा फुले चौक,
कल्याण पो. ठाणे गु.र.नं. ३७३/२०२२ भादवि कलम ३९२,३४ ८)बाजारपेठ पो. ठाणे, कल्याण गु.र.नं. १२४/२०२२ भादवि कलम ३९२,३४
९) बाजारपेठ पो. ठाणे, कल्याण गु.र.नं. १४२/२०२२ भादवि कलम ३९२,३४
१०) मुंब्रा पो. ठाणे गु.र.नं.४५९/२०२२ भादवि कलम ३७९

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री.बिपीनकुमार सिंह सो, मा. पोलीस सह आयुक्त, डॉ. श्री जय जाधव सो, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. महेश घुर्ये सो, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे)श्री सुरेश मेंगडे, मा.सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. विनायक वस्त, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली
गुन्हे शाखा,कक्ष-१ चे १) वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल शिंदे, २) सहा. पोलीस निरीक्षक हर्षल कदम, ३) सहा. पोलीस निरीक्षक आर.एम.तडवी, ४)पोहवा/१०३१ रोहिदास पाटील, ५) पोहवा/९८० विश्वास पवार, ६) पोहवा/१५५७ बालाजी चव्हाण, ७)पोना/२८८३ निलेश किंद्रे, ८)पोना/२६८३ शशीकांत जगदाळे, ९) पोना/२१८९ अजय वाघ, १०)पोना/२०४९ दिपक मोरे ११) पोना/२९९९ धनाजी भांगरे १२) पोना/२७६३ रविंद्र सानप १३) पोकॉ/४४४४ आशिष जाधव, १४) पोकॉ/३८४३ विशाल सावरकर, १५) पोकॉ/४४४६ अश्विन ठाकूर १६) चालक/सहा. पो.उप. निरीक्षक प्रदीप लिंगाळे १७) चालक/पो.शि./भोईर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

उघडकीस आणलेले गुन्हे
१)कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे गु.र.क. २७७/२०२२ भादवि कलम ३९२,३४
२) नेरूळ पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.२१९/२०२२ भादवि कलम ३९२
३) नेरूळ पोलीस ठाणे येथे गु.र.क.२२८/२०२२ भादवि कलम ३९२,३४
४) सानपाडा पोलीस ठाणे येथे गु.र.क.९५/२०२२ भादवि कलम ३९२,३४
५) कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.२५९/२०२२ भादवि कलम ३९२

आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत

नमूद गुन्हयातील आरोपी हे प्रथम टेहळणी करून मोटार सायकल चोरी करतात, त्यानंतर मॉर्निग वॉक साठी पायी फिरणा-या महिलांना वॉच करून संधी मिळताच गळयातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून चोरी करून मोटार सायकलवरून पळून जातात.

अटक आरोपीत यांची पार्श्वभूमी

रिजवान ईस्माइल शेख याचेवर यापूर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत

१) कोपरखैरणे पो. ठाणे गुरनं. २५५/२०१६ भादवि कलम ३९२,३४ २) कोपरखैरणे पो. ठाणे गुरनं.३१४/२०१५ भादवि कलम ३९२,३४
३) कोपरखैरणे पो. ठाणे गुरनं. ४३/२०१६ भादवि कलम ३९२
४) कोपरखैरणे पो. ठाणे गुरनं. २७/२०१६ भादवि कलम ३९२
५) कोपरखैरणे पो. ठाणे गुरनं. २८३/२०१५ भादवि कलम ३९२
६) कोपरखैरणे पो. ठाणे गुरनं.२८७/२०१५ भादवि कलम ३९२
७) कोपरखैरणे पो. ठाणे गुरनं. ४१९/२०१५ भादवि कलम ३९२
८) कोपरखैरणे पो. ठाणे गुरनं.२०४/२०१५ भादवि कलम ३९२
९) कोपरखैरणे पो. ठाणे गुरनं.५६/२०१५ भादवि कलम ३९२ १०) नेरूळ पो, ठाणे गुरनं. ३३/२०१६ भादवि कलम ३९२
११) कळवा पो. ठाणे गुरनं. १८०/२०१७ भादवि कलम ३९२,३४ १२) कळंबोली पो. ठाणे गुरनं. ३३३/२०१७ भादवि कलम ३९२,३४ १३) शिळ-डायघर पो. ठाणे गुरनं.११२/२०१८ भादवि कलम ३९२,३४
१४) नौपाडा पो. ठाणे गुरनं. १७५/२०१७ भादवि कलम ३९२ १५) नौपाडा पो. ठाणे गुरनं. २८१/२०१७ भादवि कलम ३९२ १६) महात्मा फुले चौक, कल्याण पो. ठाणे गु.र.नं. २४२/२०२२ भादवि कलम ३९२.३४
१७) महात्मा फुले चौक, कल्याण पो. ठाणे गु.र.नं. २४५/२०२२ भादवि कलम ३९२.३४
१८) महात्मा फुले चौक, कल्याण पो. ठाणे गु.र.नं.३१६/२०२२ भादवि कलम ३९२.३४
१९) महात्मा फुले चौक, कल्याण पो. ठाणे गु.र.नं.३४८/२०२२ भादवि कलम ३९२.३४
२०) महात्मा फुले चौक, कल्याण पो. ठाणे गु.र.नं.३७३/२०२२ भादवि कलम ३९२.३४
२१) बाजारपेठ पो. ठाणे, कल्याण ग.र.नं. १२४/२०२२ भादवि कलम ३९२,३४
२२) बाजारपेठ पो. ठाणे, कल्याण गु.र.नं. १४२/२०२२ भादवि कलम ३९२,३४
२३) मुंब्रा पो. ठाणे गु.र.नं.४५९/२०२२ भादवि कलम ३७९.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट