एव्हरेस्ट अबॅकस च्या माध्यमातून गणितामध्ये उज्वलं एव्हरेस्ट गाठीत माणगांव शाखेचे नाव उंचावलं …..

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव रायगड :- माणगांव :-आजचे विद्यार्थी अबॅकस च्या माध्यमातून गणिता मध्ये प्रविण्य मिळवितांना दिसतात. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी माणगांव शाखे मध्ये या गणिती पद्धतीचे शालेय विद्यार्थ्यांना धडे दिले जातात. या संदर्भात घेण्यात आलेल्या परीक्षेत माणगांव येथील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करीत एक प्रकारे यशाचे एव्हरेस्ट गाठले. यशस्वी विध्यार्थ्यांना अबॅकस शिक्षिका सौ.नलिनी जमधाडे यांनी मार्गदर्शन केले.

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी कडून 31 व्या राष्टीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन 22 सप्टेंबर 2024 रोजी डोंबिवली येथे करण्यात आले होते या वेळी युनियन बँक ऑफ इंडिया चे सेवानिवृत्त अधिकारी सोपान वानखेडे, सुरज शेट्टी, सोमनाथ चासकर, स्नेहल गवई (सिनियर मॅनेजर )आशिष रोंघे (मॅनेजर )पोस्को स्टील कंपनी हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी चे प्रमुख अशोक घडेकर उपस्थित होते. या स्पर्धेत डोंबिवली, सांताक्रुज, पनवेल, रायगड, रत्नागिरी, ठाणे, वसई, विरार, कल्याण, बदलापूर, माहीम, बोरिवली येथून विद्यार्थी सहभागी झाले होते. या मध्ये एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी माणगाव शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.यामध्ये कु. स्वरांगी पंकज नागे रँक 2,कु.निकिता रामा राजू कनुमूरी रँक 3,कु. आर्या संदीप गेडाम रँक 6,कु. असिफ राहील कागदी रँक 7,कु. हिंदवी संभाजी भोसले रँक 8,कु. नव्या राजेश शेलार 8,तर अद्विक आशिष रोंघे, मौर्या रत्नाला, उर्वी अमोल माने, आरायना विभुते एक्सलंट तर कु. तनया सचिन बोंबले, तियारा संजय जैन, तिश्या संजय जैन, कु. खदिजा अथर शेख, कु. निशिता रामा राजू कनुमूरी, आर्यन गणेश सानप, ओवी अनंतशिंग राजपूत, कु. दृष्टी प्रवीण वारे, कु. आयुक्ती संदीप गेडाम हे विद्यार्थी बेस्ट रँक मध्ये उत्तीर्ण झाले.

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी च्या एकूण 11 वेगवेगळ्या सेंटर वर ही स्पर्धा झाली. यामध्ये एकूण 9300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. अबॅकस मुळे फक्त विद्यार्थ्यांची गणिताची गती वाढत नाही तर त्या सोबत एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर त्यांची बौद्धिक पातळी सुद्धा वाढते असे माणगाव शाखेच्या संचालिका सौ. नलिनी जमधाडे मॅडम यांनी सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट