पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे “महात्मा गांधी” व “लाल बहादुर शास्त्री” यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन जयंती साजरी..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग GAD -49022/ 142023 -GAD (DESK-29) दिनांक- 27/12/2023 शासन निर्णय तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुबंई यांचे पत्र क्र. पोमसं / 36 / र.व.का./(8300) शा.नि. अधिसुचना /01/2023 मुंबई दिनांक- 29/12/2023 अन्वये सन- 2024 मध्ये सर्व शासकिय कार्यालयात राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ती संत व समाज सुधारक यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांचे शुभ हस्ते दिनांक -02 ऑक्टोंबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे महात्मा गांधी तसेच लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले..

सदरचे आयोजित जयंती कार्यक्रमात पोलीस अधीक्षक, गोंदिया, मा.श्री. गोरख भामरे, यांच्यासह, प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह), श्रीमती नंदिनी चानपुरकर, तसेच कार्यालयीन पोलीस अधिकारी/अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com