गौतम दगडूजी वानखडे यांनाआशादीप महिला आधार मंच मुंबई आणि प्रिय दर्शनी फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय सत्यमेव जयते पुरस्काराने गौरव करण्यात आला

0
WhatsApp Image 2024-10-02 at 4.46.30 PM
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

ठाणे :-दि.२९सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती चे औचित्य साधुन सत्कार मुर्ति गौतम दगडुजी वानखेड़े , अमरावती यांचे आशादीप महिला आधार मंच, मुंबई आणि प्रिय दर्शिनी फाऊंडेशन यांच्या वतीने वसंत नाईक सभागृह, नौपाडा ठाणे(प) येथे पद्मश्री मा.तात्या लहाने यांच्या शुभ हस्ते गौतम द.वानखेड़े यांना राज्य स्तरीय सत्यमेव जयते पुरस्कार २०२४ देऊन त्यांनी केलेल्या समाजकार्याचा गौरव करण्यात आला. त्यांनी महाराष्ट्रातील विदर्भ भागात होतकरु गरीब विद्यार्थी तसेच इतर युवकांना , समाजातील नागरिकांना गेल्या ३० वर्षांपासुन ते आजतायगत सामाजिक आणि धार्मिक कामात निःस्वार्थ पणे मदत करत आहेत. संपुर्ण विदर्भ विभागातुन त्यांची या पुरस्करा करीता निवड झाली होती.

पालघर मधील इंजिनीयर .विक्रम दिपक गावंडे यांनी पत्रकार बंधु भाऊसाहेब गुंड, मंगेश उईके, ऋषिकेश जाधव, कल्पेश गायकवाड,समवेत पालघर येथे सुद्धा त्यांचे पुष्पगुच्छ व विदर्भचा पेहराव भेट देऊन पुढील वाटचली करीता शुभेच्छा देण्यात आल्या.

सदर सत्कार समारंभास तात्या लहाने ,अशोकजी माळवान,आमदार व कामगार नेते भाई जगताप , आशा दिप महिला आधार मंच च्या अध्यक्षा आशाताई संतोष भोईर , विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणारे मान्यवर व गौतम वानखेड़े यांचे कुटुंबीय त्याच बरोबर बहुसंख्येने नागरिक सुद्धा उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट