गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे… “पोलीस दादालोरा खिडकी योजना,” “एक हाथ मदतीचा उपक्रमांतर्गत”ला मोठा प्रतिसाद…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- पोलीस मुख्यालय गोंदिया येथे 26 सप्टेंबर 2024 रोजी ” निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ठरित्या संपन्न….नक्षलग्रस्त भागातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद…





याबाबत थोडक्यात माहिती अशी की, गोंदिया जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा असून गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता (विशेषतः नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या कल्याणा करीता) कायम अग्रेसर राहुन पोलीस दादालोरा एक खिडकी योजनेच्या माध्यमातून विविध कल्याणकारी नाविण्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात..
त्याचाच एक भाग म्हणुन मा.श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतुन आणि मा. श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया (कॅम्प देवरी) यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपुर्ण उपक्रमांतर्गत जिल्हयातील दुर्गम, अति- दुर्गम भागातील गोर- गरीब, तसेच आदिवासी बांधवांचे आरोग्य निरोगी राहावे यादृष्टीने गोंदिया जिल्हा पोलीस दल, ट्रायबल वेलफेअर कमीटी, रोटरी डिस्ट्रिक्ट सह आयोजक शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर, वानाडोंगरी नागपूर, रोटरी क्लब ऑफ नागपुर डाऊन टाऊन, जीवन आधार सामाजिक संस्था तसेच माऊली मित्र मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक- 26 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस मुख्यालय गोंदिया येथे निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते….
सदरचे आयोजीत निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबीरामध्ये शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी,नागपूर येथील स्त्री रोग, अस्थिरोग, नेत्ररोग, बालरोग, दंतरोग, शल्य-चिकीत्सक, कान- नाक- घसा, न्युरो सर्जन, किडनी रोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, इ. आजारांचे तज्ज्ञ वैद्यकिय चमुसह उपस्थित होते……वैद्यकीय डॉक्टरां कडून नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली…तसेच मोफत औषधी वाटप करण्यात आले आहे…. तसेच आरोग्य शिबीरात बी.पी. शुगर व इतर आरोग्यविषयक तपासणी करण्यात आलेल्या आहेत…सदर शिबीरामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्या पेशंटला अधिक उपचारा करीता रेफर करण्याची गरज आहे…..अश्या पेशंट ला डॉ. शालिनीताई मेघे हॉस्पीटल, नागपूर येथील अॅम्बुलन्स द्वारे नागपूर येथे नेवुन मोफत उपचार करण्यात येणार आहे…
“निःशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबिर” पोलीस मुख्यालय गोंदिया येथील प्रेरणा सभागृहात….श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव यांचे अध्यक्षतेत आणि 1)ट्रायबल वेलफेअर कमीटी, रोटरी चे चेअरमन श्री. राजीव वरभे सर, 2) जिवन आधार बहुद्देशीय संस्था चे अध्यक्ष श्री. जिवन जवंजाळ सर 3) रोटरी क्लब ऑफ नागपुर डाऊन टाऊन, नागपूर चे प्रेसीडेंट श्रीमती प्रतिक्षा मायी 4) शालीनीताई मेघे हॉस्पीटल नागपूर चे अॅडमिनीस्ट्रेटीव्ह ऑफीसर डॉ. अश्वीन रडके सर 5) माऊली सेवा मित्र मंडळ चे अध्यक्ष श्री. सुहास खरे सर, आणि वैद्यकीय चमू यांच्या प्रमुख उपस्थितीत व संपूर्ण देखरेखीखाली महाआरोग्य रोगनिदान शिबिर कार्यक्रम उत्कृष्ठ रित्या पार पाडण्यात आले.नक्षलग्रस्त प्रभावित ग्रामीण भागातील आदिवासीं समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून शिबिराचा लाभ घेतला.. त्यात 1057 सहभागी लाभार्थ्यांचे रोगनिदान तपासणी, औषध उपचार करण्यात आला.
तसेच 269 जणांना तपासणी करून (गंभीर आजारा करिता) Refer To Nagpur कऱण्यात आले आहे… नागपुर येथे रेफर करण्यात आलेल्या पेशंट ना डॉ. शालिनीताई मेघे hospital nagpur येथे नेवून निःशुल्क मोफत उपचार करण्यात येणार आहे.
महाआरोग्य शिबिरास उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या नक्षल प्रभावित भागांतील नागरिक आदिवासी बंधू भगिनी तसेच आरोग्य शिबिरात सहभागी सर्वांचे जेवणाची..व बसद्वारें जाण्या येण्याची ने – आण करण्याची निःशुल्क सोय पोलीस दलातर्फे कऱण्यात आली.
विशेष बाब म्हणजे रोटरी क्लब, जीवन आधार संस्था, शालीनीताई मेघे हॉस्पीटल नागपूर,माऊली सेवा मिन्त्र मंडळ नागपुर यांचे…. गोंदिया जिल्हा पोलीस दलास नेहमी सहकार्य लाभत असते… त्यांच्या समन्वयाने गोंदिया जिल्हयात पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत कित्येक आरोग्य शिबीर राबविण्यात आलेत….विशेषतः सन- 2022 ते 2024 मध्ये जिल्ह्यातील सर्व सशस्त्र दुरक्षेत्र हद्दीत “ऑपरेशन रोशनी अंतर्गत” मोतीबिंदु निदान व शस्त्रक्रिया शिबीर राबविण्यात आलेले आहेत…. . ज्यामध्ये 2500 चे वर पेशंट नी शिबीराचा लाभ घेतलेला असुन 300 पेक्षा जास्त नागरीकांची मोतीबिंदुची मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे..
मा. वरिष्ठांचे निर्देश मार्गदर्शनात सदरचे “महाआरोग्य रोगनिदान शिबिर” घेण्यात आले असुन राखीव पोलीस निरीक्षक श्री. रमेश चाकाटे, श्रेणी पो-उपनी रोशन उईके, सहायक फौजदार मुस्तफा सरवर, पोहवा लियोनार्ड मार्टिन, मंगला प्रधान, राज वैद्य, भाष्कर हरीणखेडे यांनी अथक परिश्रम घेवून उत्तमरीत्या कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडण्यात मदत केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com