19 वा कोकण प्रादेशिक पोलीस कर्तव्य कार्यक्रम मेळा 2024 अभिनंदन समारंभ संपन्न..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :-पालघर जिल्हा पोलीस आयोजीत १९ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा सन २०२४ दिनांक २४/०९/२०२४ ते दिनांक २६/०१/२०२४ रोजी दरम्याण संपन्न झाला. सदर स्पर्धेमध्ये कोकण परिक्षेत्रातील ५ घटकांकडून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदविला. सदर मेळाव्याकरीता 1) Scientific Aids to Invastigation, 2) Police Photography, 3) Police Videography, 4) Anti-Sabbotage Check, 5) Computer Awareness, 6) Dog Squad Competition असे मुख्य विषय व त्याचे २४ उपप्रकारांवर लेखी, तोड़ी तसेच प्रात्यक्षिक परिक्षेचे आयोजन करून सदर विषयांचे तज्ञांच्या आधारे परिक्षण करण्यात आले आहे. एकूण ६ स्पर्धा प्रकार व २४ उनप्रकारामध्ये एकूण १७ पोलीस अधिकारी व ६५ पोलीस अंमलदार तसेच श्वान पथक यांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करीत सदर मेळावा खेळी मेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी आपले योगदान दिले. सदर स्पर्धा निःपक्षणती व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी त्या त्या विषयाचे तज्ञ परिक्षक लाभलेले होते.









स्पर्धेच्या नियमानुसार चांगले कौशल्य दाखवणाया पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना एकूण २० सुवर्ण, २० रजत, २० कांस्य पदक प्रदान करण्यात आले. त्यापैकी पालघर पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंगलदार यांनी देदीप्यमान कागगिरी करत एकंदरीत ६ गुख्य विषयांगध्ये पवकांची लयलूट करीत आपल्या नावावर १० सुवर्ण, ०८ रजत व ०९ कास्य अशा एकूण २७ पदकासह पदक तालिकेत प्रथम स्थान प्राप्त करुन सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्यापाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्हा ०६ सुवर्ण, ०५ रजत व ०२ कांस्य अशा एकूण १३ पदकांसह दूसरे स्थान तर रत्नागिरी जिल्ह्याने ०१ सुवर्ण, ०४ रजत व ०९ कांस्य असे एकूण १० पदक पटकावत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. ठाणे ग्रामिग न रायगड ग्रा.जिल्ह्यांनी अनुक्रमे ०६ ग०४ पदकांसह चौथे व पानने स्थान प्राप्त केले आहे.
सर्व पदक विजेते यांना गोविंद बोडके, जिल्हाधिकारी पालघर, बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला व सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केलेल्या संघास प्रशस्त ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तद्नंतर सदर स्पर्धा निःपक्षपाती व पादरर्शकपणे पार पाडण्यासाठी सहयोग करणाऱ्या सर्व परिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
स्पर्धेअंती गोविद बोडके, जिल्हाधिकारी पालघर व बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी सदर स्पर्धेमधील सर्व पदक प्राप्त स्पर्धकांचे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले व भविष्यात राज्यस्तरावर व देशपातळीवर देखील अशाच प्रकारे आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करून उत्तम कामगिरी करणेकरीता सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन कार्यक्रम सपन्न करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com