दैनिक युवक आधारचा प्रथम वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न…

प्रतिनिधी- सचिन पवार
माणगांव/ रायगड :-जय महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रसाद काथे व आयबीएन लोकमत 18 चे सहसंपादक विलास बडे यांची उपस्थिती ठरली खास आकर्षण ठरले.
वर्षभरापूर्वी दैनिक युवक आधार ने पनवेल शहरांमध्ये दिमाखात पाऊल ठेवले होते दर्जेदार बातम्या व लेख यामुळे वाचकांच्या पसंतीस हे वर्तमानपत्र पडले आहे.
अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला दैनिक युवक आधार या दैनिकाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा परिणीता फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभलेला वर्धापन सोहळा जय महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रसाद काथे व आयबीएन लोकमत18 चे सहसंपादक विलास बडे ऋषिकेश राजकिरण प्रसिद्ध अभिनेता डॉ. नंदकुमार जाधव साहेब अध्यक्ष डॉ.ना.म .जाधव फाउंडेशन पनवेल प्रशांत सागवेकर वृत्त निवेदक जय महाराष्ट्र न्यूज चैनल दैनिक युवाक आधारच्या मुख्य संपादक भारती संतोष आमले यांच्या उपस्थित मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.नंदकुमार जाधव साहेब अध्यक्ष डॉ.ना.म .जाधव फाउंडेशन पनवेल यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा विभाग संपादक जगन्नाथ रासवे सर यांनी केले.
या कार्यक्रमांमध्ये जय महाराष्ट्र चॅनलचे वृत्त निवेदक प्रशांत सागवेकर यांनी घेतलेली मुलाखत जय महाराष्ट्र न्यूज चैनलचे संपादक प्रसाद काथे सर आयबीएन लोकमत 18 चे सहसंपादक विलास बडे सर यांची घेतलेली मुलाखत खास आकर्षण ठरलं. नवोदित पत्रकारांना या मुलाखती द्वारे संबोधित करण्यात आले. या मुलाखतीमध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या नवीन पत्रकारांनी कोणते नियम पाळावेत कशा पद्धतीचे पत्रकारिता करावी याचा मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक प्रसाद काठे सरांनी सामाजिक भान ठेवून समाज हिताची पत्रकारिता करावी असा मोलाचा संदेश दिला.
नियोजित पत्रकारांना मार्गदर्शन करत अनेक विषयावर या मुलाखतीमध्ये चर्चा करण्यात आली या कार्यक्रमासाठी नागपूर यवतमाळ जालना बुलढाणा बीड अहमदनगर मुंबई व इतर विभागातून दैनिक युवक आधारचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व दैनिक युवा आधारच्या प्रतिनिधींना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रातील मान्यवर वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर शैक्षणिक वकील जाहिरात दार महाराष्ट्रभरातील प्रतिनिधी इतर माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांनी उपस्थित राहून दैनिक युवक आधारला वर्धापनदिना नि मित्त शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांचे शेवटी आभार संपादक संतोष आमले यांनी मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com