जुन्नर येथे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणने ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :– पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणारे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मा पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
दिनांक २३/९/२०२४ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना पोहवा संदीप वारे व पोकॉ अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की जुन्नर नजिक कुरण फाटा येथे इसम नामे रोहित सहादू बटणपुरे हा येणार असुन त्याच्या जवळ एक गावठी पिस्टल आहे.मिळालेल्या बातमी नुसार गून्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लाऊन इसम नामे रोहित सहादू बटणपुरे वय १९ रा.भहुळ ता.खेड जि.पुणे मूळ रा.मदलापुर उदगीर ता.उदगीर जि.लातूर याला ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा मिळून आला. त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत जुन्नर पोलिस स्टेशन येथे गुन्हे शाखेचे पोहवा दीपक साबळे यांनी फिर्याद दिली असुन गुन्हा दाखल केला आहे.

वरील आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तापासकामी जुन्नर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख सो,अप्पर पोलिस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर पो.हवा. दिपक साबळे
पो.हवा. विक्रम तापकीर
पो.हवा. संदिप वारे
पो. हवा राजु मोमीन
पो. हवा हेमंत वीरोळे
पो.कॉ. अक्षय नवले
पो.कॉ. निलेश सुपेकर
यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com