अधिकारी घडवण्यासाठी अधिकारी फाउंडेशनचे योगदान उल्लेखनीय -DYSP भूषण माने…

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :-अधिकारी फाउंडेशन मार्फत गेल्या एक वर्षापासून बारामती येथे शंभर मुलांची आसनक्षमता असणारी मोफत स्वरूपात अभ्यासिका चालवली जाते याचं अभ्यासिकेतील यावर्षी यशस्वी झालेल्या उमेदवारांचा सन्मान सोहळा काल पार पडला या सोहळ्यासाठी प्रमूख पाहुणे म्हणून UPSC तून 545 रँक ने उत्तीर्ण होणारे व सद्या भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेर्स या विभागात असिस्टंट डायरेक्टर म्हणून सेवा बजावणारे अल्ताफ शेख सर, DYSP भूषण माने सर व अधिकारी फाउंडेशन या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष उस्मान शेख सर यांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना DYSP भूषण माने यांनी मुलांना सक्सेसचां कानमंत्र देऊन आयुष्याकडे बघण्याचां आपला दृष्टीकोन कसा आहे यावर आपली आयुष्याची दिशा ठरते बहुतेक लोक हे नकारात्मक दृष्टिकोन बाळगून जगत असतात अश्या नकारात्मक दृष्टिकोनामुळेच त्यांना अपयश येते असे प्रतिपादन DYSP भूषण माने यांनी करून अधिकारी फाउंडेशनच्या मोफत राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमाचे कौतुक केले.
जगात कोणतीही व्यक्ती अशी नसेल ज्या व्यक्तीकडे सर्वकाही आहे आणि त्याला कोणत्याही समस्या मर्यादा नाहीत पण मर्यादा शरीराला असाव्यात मनाला आसू नये असे प्रतिपादन ICLS अल्ताफ शेख यांनी करून यशस्वी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
पुढे अधिकारी फाउंडेशनचे अध्यक्ष उस्मान शेख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की संघटनेचे उद्दिष्ट गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोसांहित करून त्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहचवणे तसेच त्याच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे आहे ज्या मुलांच्या डोळ्यात अधिकारी होण्याचे स्वप्न तरळत आहेत है या उपक्रमाचा माध्यमातून सत्यात उतरविण्याचा संघटनेचा संकल्प आहे आणि भविष्यातही अधिकारी फाउंडेशन मार्फत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी नवनविन योजना राबवून समाजातील तळागाळातील मुलांना अधिकारी बनवण्यास मदत करू हे आश्वासन दिले .
शेवटीं अभ्यासिकेतील यशस्वी उमेदवारांनी अधिकारी फाउंडेशनचे आभार मानले
यशस्वी उमेदवार पुढील प्रमाणे
कृष्णा माने – रायगड पोलीस
ऋषिकेश भोसले – ठाणे शहर पोलिस
अक्षय सोनवणे – पुणे ग्रामीण पोलीस
राहुल शेलार – पुणे ग्रामीण पोलीस
मोहित जाधव – SRPF गट क्र 5
नितीन घागरे – SRPF गट क्र 5
रेश्मा डोंबाले – कॅनॉल इन्स्पेक्टर
शेवटीं सर्व यशस्वी उमेदवारांना प्रमुख पाहुण्यांकडून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन यावर न थांबता पुढे जात रहा अनमोल सल्ला दिला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com