मुंबईच्या झवेरी बाजारात दागिणे पळवणाऱ्याला अटकआझाद मैदान पोलीसांची कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई :– …मुंबईतील झवेरी बाजारात खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीची बॅग उघडून सोन्याचा ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली. ही कारवाई आझाद मैदानच्या गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईत चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीने झवेरी बाजारातून २३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (पेंडल, ब्रासलेट, माळ, चैन, मंगळसूत्र, टॉप्स, रिंग्स आदी सोन्याचे दागिने व २१ हजार ३८० रुपये रोख रक्कम एका बॅगत ठेवली. खरेदी करून झाल्यानंतर ते चालत डी. एन. रोड अंजुमन इस्लाम शाळेजवळ आले असता त्यांना बॅगची चेन उघडी असल्याचे लक्षात आले. त्यांनी बॅग तपासली असता त्यातील मुद्देमाल चोरीला गेल्याचे समजले. त्यांनी त्वरित आझाद मैदान पोलीस ठाणे गाठले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञातावर गु.र.क्र. ३१५/२०२४ कलम ३०३ (२) मा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या तपासासाठी तत्काळ पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे दोन पथके तयार करण्यात आली. गुन्ह्याचे घटनास्थळ निश्चित नसल्याने फिर्यादीने दिलेल्या माहितीच आधारे तांत्रिक तपास केला. अभिलेखावरील आरोपीकडे तपास करून पाहीजे आरोपीची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादीने ज्या-ज्या ठिकाणाहुन माल खरेदी केला. त्या परिसरात फिरुन माहिती घेतली असता गुप्त बातमीदारमार्फत चोरी करणा-या इसमाचे नाव आब्बास मुस्तफा लब्बे, वय २८ वर्षे, धंदा-मजुरी, रा.ठी. रे रोड, शिवडी, मुंबई या ठिकाणी राहत असल्याचे समजले.
सदर आरोपी रे रोड येथील पत्त्या वर कधीतरी येत असल्याचे व स्वतःचे अस्तित्व लपवुन राहत असल्याचे समजल्याने त्याच्यावर पाळत ठेवुन तो घरी येणार असल्याची माहिती मिळाल्याने १० सप्टेंबर रोजी सापळा रचला. पोलीस आल्याची भणक लागल्याने घरातून पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्याने सदरचा गुन्हा त्याचा मित्र नामे कालीया (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्या सोबत केला असुन सह आरोपीचा शोध सुरू आहे. तसेच अटक आरोपीवर शिवडी, सीएसएमटी व मुंबई सेंट्रल रेल्वे, भोईवाडा पोलीस ठाण्यांमध्ये ५ गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अटक आरोपीने चोरलेले २३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने राहते घरी लपवुन ठेवले असल्याने ते हस्तगत करण्यात आले असून आरोपीला १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (का व सु), सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त (द.प्रा.वि.) अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. प्रविण मुंढे, सहायक पोलीस आयुक्त (आ.मै.वि.) अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिपक दळवी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रविण पावले, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि लिलाधर पाटील व सपोनि आनंद शहाणे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार, राजेंद्र कटरे, संदीप मावळे, सचिन माने, ज्ञानेश्वर मुंढे, विजय वाडीले, अमरदीप किर्तकर, सतिश वाळे, सोमनाथ घुगे, मनाजे गारे, दिपक पवार यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com