खेड येथे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोन जणांना अटक : स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कामगिरी..

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :– पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणारे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मा पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

दिनांक २१/९/२०२४ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना पोहवा संदीप वारे व पोकॉ अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की राजगुरूनगर गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवे लगत होलेवाडी येथील पुलाखाली इसम नामे प्रथमेश बोऱ्हाडे हा त्याच्या एका साथीदारासह येणार असून त्यांच्या जवळ एक गावठी पिस्टल आहे.मिळालेल्या बातमी नुसार गून्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लाऊन १)प्रथमेश रमेश बोऱ्हाडे वय २५ वर्ष रा.पाबळ रोड, राजगुरुनगर २) सुनील बबन पाचपुते वय २६ रा.चींचोशी ता.खेड यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असता सुनील बबन पाचपुते याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा मिळून आला असून त्या बाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर कट्टा मला प्रथमेश बोऱ्हाडे याने दिल्याचे त्याने सांगितले आहे.त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत खेड पोलिस स्टेशन येथे गुन्हे शाखेचे पोहवा दीपक साबळे यांनी फिर्याद दिली असुन गुन्हा दाखल केला आहे.
वरील आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तापासकामी खेड पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख सो,अप्पर पोलिस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर
पो.हवा. दिपक साबळे
पो.हवा. विक्रम तापकीर
पो.हवा. संदिप वारे
पो.कॉ. अक्षय नवले
पो.कॉ. निलेश सुपेकर
यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com