१२ तासाच्या आत वयोवृद्ध आजी सुखरूप नातु प्रसाद पुरी यांच्या ताब्यात…

0
Spread the love

प्रतिनिधी- उमेद सुतार

पुणे :- दिनांक 19/9/2024 रोजी वार गुरुवारी आजीची मिसिंग केस बिबेवाडी पोलीस स्टेशनला होती सकाळी 9 वाजल्यापासून पुणे अप्पर सुपर लोअर इंदिरानगर येथुन श्रीमती काशीबाई पुरी वय 80 सकाळी विसर भोळ्या आजी राहत्या घरातून निघून गेल्या आणि वयामानानुसार त्यांना काही कळत नसल्यामुळे त्या कुठून कशी आल्या त्यांना काही सांगता येत नव्हते त्या आजी आपल्या ग्रुपचे सदस्य यांना सिंहगड रोड विठ्ठलवाडी येथे मिळाल्या व त्यांनी मला फोन करून सांगितले भाऊ एक आजी सापडलेल्या आहेत त्यावेळेस त्यांना मि फोनवरून सांगितले ताबडतोब वडगाव चौकी येथे त्यांना घेऊन या मी चौकीला येतो माझ्या दिवसभरातल्या कॉलिंग मध्ये काही कॉल चेक करून मला दुपारी पाच वाजता एक कॉल आला होता पुणे इंदिरानगर येथून माझ्या वयावृद्ध आजची हरवले आहेत.

त्यावेळी मी त्यांना सांगितले होते. त्या आजींचा एक फोटो मला पाठवून ठेवा व त्यांनी तो फोटो पाठवला होता. आणि माझ्या लक्षात आले की आपल्या सदस्यांना ज्या आजी सापडले आहेत कदाचित त्याच असतील असे मला वाटले आपल्या सदस्यांनी मला त्या आजींचा फोटो पाठवला आणि ते आजीच्या नातवाने मला पाठवलेला फोटो मॅच झाला आणि मी ताबडतोब त्या आजीच्या नातवाला फोन केला की दादा तुम्ही कुठे आहात त्यांनी मला सांगितले भाऊ मी स्वारगेटला आजीला शोधत आहे.

तर मी त्यांना सांगितले आता आजींना शोधू नका आजी आम्हाला सापडले आहे तुम्ही ताबडतोब सिंहगड रोड वडगाव चौकीला या आणि ते वडगाव चौकी येथे आले आणि आजींना सुखरूप पोलिसांच्या सहकार्याने मिसिंग मिसिंग ग्रुपच्या सहकाऱ्यांनी आजीला सुखरूप नातवाच्या ताब्यात देण्यात आली आहे आजीच्या नातवाने सर्वांचे आभार मानले इथून पुढे मी सुद्धा आपल्याबरोबर हरवल्यांना आणि सापडल्यांना शोधण्याचे काम करेल .

ह्या कामांमध्ये मिसिंग ग्रुपचे सदस्य अविनाश जाधव ,संकेत इंकर, तानाजी मांगले, संतोष बसगुडे, पत्रकार प्रकाश यादव, सिंहगड पोलीस स्टेशनचे वडगाव चौकीचे सह पोलीस निरीक्षक निंबाळकर साहेब , सह पोलीस निरीक्षक जायबाय साहेब ,सचिन गायकवाड साहेब मते साहेब गिरी गोसावी साहेब ,मोरे साहेब ,वर्षा मॅडम अशी माहिती शिवा भाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप यानी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट