पोलीस अधीक्षक, मा. श्री. गोरख भामरे, यांनी जिल्हा वाहतूक पोलीस अंमलदाराचे बंदोबस्त दरम्यान केलेल्या प्रशंसनीय कामाबद्दल* “प्रशंसापत्र” देवून केले कौतुक …

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- दिनांक -13/09/2024 रोजी सर्कस मैदान, गोंदिया येथे महत्वाचे- अति महत्वाचे व्यक्ती यांचे दौरा बंदोबस्त प्रसंगी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार पो. शि. प्रविणकुमार प्रभुजी वाढीवे, ब.नं. 1879 यांची वाहतुक नियमन करीता जयस्तंभ चौक, गोंदिया येथे बंदोबस्त ड्युटी असतांना, सदर पो. अंमलदार यांनी बंदोबस्त दरम्यान वाहतुक सुरळीत राहण्यासाठी भर पावसात कर्तव्यदक्ष राहुन अथक परिश्रम घेऊन वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अत्यंत मोलाची प्रशंसनीय कामगीरी बजावली आहे. सदर बाबत समाज माध्यमावर व्हिडिओ प्रसारित होवून सदर अंमलदाराचे सगळीकडे कौतुक होत होते…ही प्रशंसनीय बाब मा. पोलीस अधीक्षक यांचे लक्षात येताच प्रंशसनीय कामाचे कौतुक म्हणून पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांनी सदर अंमलदार यास ,”प्रशंसापत्र ” देवून अभिनंदन कौतुक केले आहे….तसेच भविष्यातसुध्दा चांगले समाजकार्य घडावे पोलीस दलाचे नाव उंचवण्याकरिता उत्कृष्ठ कामगिरी करावी अश्या शुभेछ्या दिलेल्या आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com