मराठा उद्योजक संघाचे सदस्य रायगड दर्शनासाठी गेले असता प्रायव्हेट बस ३० फुट खाली गेल्याने अपघात…

उपसंपादक-राकेश देशमुख
कोंझर :- दिनांक १५/०९/२०२४ रोजी नवी मुंबईतील मराठा उद्योजक संघाचे सदस्य रायगड दर्शनासाठी आलेले असताना परतीच्या प्रवासात कोंझर जवळील वळणावर त्यांची बस प्रायव्हेट लक्झरी गाडी क्रमांक एमएच ०४ जेके ८३८२ ही २५ ते ३० फूट खाली गेल्याने अपघात झाला होता.
अपघातीत बस मध्ये ४४ प्रवासी होते, सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी नाही तसेच कोणी गंभीर जखमी देखील नाही, किरकोळ जखमा आहेत ज्यासाठी विशेष वैद्यकीय उपचाराची आवश्यकता नाही.
कोंझर आणि तेथील स्थानिक लोकांनी प्रवाशांना सुरक्षित स्थळी आणले.
त्या बस मधील एका परिचीत अपघातग्रस्त प्रवासी याचा फोन आबा नाईक याला आल्यावर त्याने त्वरित ॲड. गणेश कारंजकर यांना संपर्क करून घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी त्वरित प्रांत अधिकारी श्री भानापुरे आणि पोलीस उप अधीक्षक श्री काळे यांना कळविले आणि संपूर्ण माहिती दिली त्याचप्रमाणे स्थानिक आमदार यांना कलाविताना फोन न लागल्याने श्री विकास गोगावले यांना याची माहिती दिली.
त्यानंतर पोलीस उप अधीक्षक २० मिनिटात घटनास्थळी पोहचले आणि सर्वांना आधार देऊन आवश्यक गोष्टींची पूर्तता केली.
सदर अपघातीत प्रवाश्यांना त्यांच्या नवी मुंबई येथे घरी जाण्याकरिता आमदार भरतशेठ गोगावले यांनी त्वरित उपाययोजना करीत एस.टी. महामंडळाची बसची व्यवस्था केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com