ईद-ए-मिलाद सणाचे औचीत्य साधुन पालघर पोलीसांचा हेल्मेट वाटपाचा अनोखा उपक्रम..

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर :-बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतुन नव्याने सुरु झालेल्या वाहतुक शाखेमार्फतीने वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन होणेकरीता वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांचे संकल्पनेतुन संपूर्ण पालघर जिल्हयात सुख असलेल्या जनसंवाद अभियान अंर्तगत “रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम राबविण्यात येत असुन त्याअंतर्गत ईद-ए-मिलाद या मुस्लीम सणाचे औचीत्य साधून हेल्मेट वाटपाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

ईस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणुन साजरी केली जाते. ईद-ए-मिलाद पवित्र सणांदितशी जुलुस काढण्यात येतो व सर्वत्र सूसुख-शांती टिकुन राहावी, मानवांची सर्व त्रासांपासुन सुटका व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येते. संपूर्ण भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या असुन संपूर्ण समाजात वाहतुक नियमांची जनजागृती व्हावी व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा रोजचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी दुचाकी चालवितांना हेल्मेट किती आवश्यक आहे. असा मोलाचा संदेश देण्याकरीता दिनांक १६/०९/२०२४ रोजी ईद-ए-मिलादचे औचित्य साधुन मुस्लिम बांधवांना हेल्मेट भेट म्हणुन देण्यात येऊन पालघर जिल्हा पोलीस व जिल्हा वाहतूक शाखेकडुन एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी हेल्मेटचा नेहमी वापर करावा असे आवाहन करण्यात आले. दिनांक १६/०९/२०२४ रोजी ईद-ए- मिलादचे दिवशी पालघर जिल्हयातील नालघर, बोईसर, तारापुर, मनोर, जव्हार या पोलीस जण्याचे हद्दीतील मुस्लिम बांधवांना पोलीस अधीक्षक पालघर,अपर पोलीस अधीक्षक पालघर, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर यांच्या हस्ते एकुण ५०० हेल्मेट भेट म्हणुन वाटप करण्यात करण्यात येऊन वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.

सदरचा कार्यक्रम बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर गांचे संकल्पना व मार्गदर्शनाखाली विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर, संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर, अभिजीत धाराशिवकर, उप विभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग, विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग, पोनि/शिरीष पवार, प्रभारी अधिकारी, बोईसर पोलीस ठाणे, पोनि/रणवीर बयेस, प्रभारी अधिकारी, मनोर पोलीस ठाणे, सुरेश साळुंखे, प्रभारी अधिकारी, जिल्हा वाहतुक शाखा पालघर, सपोनि/निवास कणसे, प्रभारी अधिकारी, तारापुर पोलीस ठाणे, पोउपनि/संदीप नागरे, तसेच पालघर जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार सफी/खैरनार, पोहवा/तांदळे, पोहवा/हाटळ गोना/भुसारे, पोना/सोनकांबळे, पोशि/आकाश गिड्डे, पोशि/कुलाल, पोशि/बो-हाडे, पोशि/कमलेकर, पोशि/चौधरी, यांनी सहभागी होऊन सदरचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट