पो. ठाणे आमगाव, व अर्जुनी मोरगाव येथील दुचाकी चोरी प्रकरणात दोघांना केले जेरबंद….

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- चोरीच्या दोन मोटार सायकली हस्तगत… तर पो ठाणे गंगाझरी सोलर पॅनल चोरी प्रकरणात एकास… सोलर पॅनल सह केले जेरबंद…3 गुन्ह्यांची उकल..

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई-

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे जिल्ह्यातील पोलीस ठाणे आमगाव व अर्जूनी मोरगांव दाखल गुन्ह्यातील दोन दुचाकी चोरी प्रकरणात दोघा चोरट्यांना जेरबंद करत दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या असुन गंगाझरी चोरी प्रकरणात सोलर पॅनल प्लेट्स जप्त करण्यात आलेल्या आहेत… त्यापैकी 1) पोलीस ठाणे आमगाव दाखल गुन्हा क्र.409/2024 कलम 303(2) भा. न्याय. सं. मधील मो.सा. चोरी प्रकरणात आरोपी नामे- श्यामप्रकाश भोजराज टेंभरे वय 30 राह.चुटिया, गोंदिया यास तर 2) पो. ठाणे अर्जुनी मोरगाव दाखल गुन्हा क्र. 266/2020 कलम 379 भा.द.वि. मधील मो.सा. चोरी प्रकरणात आरोपी नामे – धम्म दीप संजय मेश्राम वय 24 वर्षे राह खाडीपार अश्या दोघांना तर 3) पो. ठाणे गंगाझरी गुन्हा क्र.319/2024 कलम 379 भा.द.वि. सोलर पॅनल चोरी प्रकरणात* आरोपी नामे- कैलाश संजय चौधरी वय 30 वर्षे राह- फुलचुर, गोंदिया अश्या तिघांना गुप्त बातमीदार यांचेकडून प्राप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले… ताब्यात घेण्यात आलेल्या सराईत चोरट्यांना मोटार सायकल व सोलर पॅनल चोरी संबंधात विश्वासात घेवून सखोल विचारपूस चौकशी केली असता दोघांनी मो. सा. चोरी केल्याचे तर एकानी सोलर पॅनल चोरी केल्याचे कबुल केले… दोन आरोपीतांकडून आमगाव गुन्ह्यात बजाज कंपनीची platina क्र. MH-35 X-9705 अंदा.किंमती 20,000/- रू. व अर्जुनी मोरगाव, गुन्ह्यात होंडा कंपनीची Activa क्र. MH-35 AK-1935 अंदा. किंमती 25,000/- रू. अश्या दोन मो.सा. हस्तगत करण्यात आलेल्या असुन पो. ठाणे गंगाझरी दाखल गुन्ह्यातील चोरीच्या 4 सोलर पॅनल प्लेट्स अंदाजे किंमती 16,000/- रुपयाच्या हस्तगत करून जप्त करण्यात आलेल्या आहेत.



याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मा. वरिष्ठांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणेस दाखल चोरी घरफोडी अउघड गुन्ह्यातील गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे निर्देश दीलेल्या आहेत…..त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पो.नि. श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यातील दाखल विविध चोरीच्या अउघड गुन्ह्यातील गुन्हेगारांचा तसेच मोटर सायकल चोरी, सोलर पॅनल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेत होते. गुप्त बातमीदार नेमून स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथके गुन्हेगारांची इत्यंभूत माहिती घेवून गुन्हेगारांचे हालचालीवर लक्ष ठेवून होते…नेमलेली पथके गुन्हेगारांच्या हालचालीची मिळालेल्या माहितीची खातरजमा व आरोपीची शहानिशा करत असताना पथकास आमगाव व अर्जुनी- मोरगाव येथील मो.सा. चोरीच्या गुन्ह्यातील, तर गंगाझरी येथील सोलर पॅनल चोरीच्या गुन्हेगारांची माहिती प्राप्त झाल्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले होते……आरोपीचा शोध घेतांना मिळालेल्या माहितीप्रमाणे दोघांजवळ चोरीच्या मोटर सायकली तर एका जवळ चोरीच्या सोलर पॅनल प्लेट्स असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमूद तिन्ही आरोपीतांना जेरबंद करून….. त्यांचे कडून चोरीच्या दोन मोटार सायकली, व चोरीच्या 4 सोलर पॅनल प्लेट्स हस्तगत करून 3 गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे…..जेरबंद कऱण्यात आलेल्या 2 गुन्हेगारांना जप्त मो.सा. सह पो. ठाणे आमगाव व अर्जुनी मोरगाव पोलीसांचे, तर एकास जप्त सोलर पॅनल प्लेट्स सहा गंगाझरी पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास कायदेशीर कारवाई प्रक्रिया आमगाव व अर्जुनी मोरगाव, व गंगाझरी पोलीस करीत आहेत..

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशांन्वये पो. नि. दिनेश लबडे, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनातील पोलीस पथक – सपोनि संजय तुपे, पोउपनि शरद सैदाणे, मपोउपनि वनिता सायकर, पो.अंमलदार राजु मिश्रा, महेश मेहर, भुवन देशमुख, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, तुलसी लुटे, संतोष केदार, हंसराज भांडारकर, दुर्गेश पाटील, चालक राम खंदारे यांनी कामगिरी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट